महाराष्ट्र
माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त गणेशगाव येथे रक्तदान शिबिर संपन्न

प्रतिनिधी : रियाज मुलाणी
मो.9921500780
युवा कार्यसम्राट दमदार आरोग्य दूत माळशिरस तालुक्याचे माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त गणेशगाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशैलीप्रमाणे सर्वसामान्य जनतेचे हित हेच आपले हित या ब्रीद वाक्याप्रमाणे डिजिटल फ्लेक्स चा अनावश्यक खर्च टाळून समाजोपयोगी रक्तदान शिबिर गणेशगाव येथे आयोजित करण्यात आले होते.
यावेळी 37 रक्तदात्यांनी रक्तदान केले प्रत्येक रक्तदात्यास एक आकर्षक भेटवस्तू देण्यात आली रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी गणेशगाव येथील सागर मोरे पाटील ,ओंकार पाटील, अभिषेक गवळी व ग्रामस्थ उपस्थित होते. माळीनगर जिल्हा परिषदेचे प्रबळ दावेदार प्रशांतभाऊ ताटे – देशमुख उपाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा माळशिरस तालुका यांच्या शुभहस्ते रक्तदान शिबिराची सुरुवात झाली.