प्राथ.शाळा क्र.६ माळीनगर येथे जागतिक महिला दिन साजरा

प्रतिनिधी : रियाज मुलाणी
मो.9921500780
माळीनगर येथील दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटी संचलित प्राथमिक शाळा क्र. ६(बारभाई गट) माळीनगर येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

प्रारंभी कार्यक्रमाच्या अध्यक्षा किरणताई टिळेकर यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. गायत्री एकतपुरे यांचे हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.या कार्यक्रमास शितल राऊत,सारिका एकतपुरे, नीता नेवसे,अनिता कांबळे, दीपा होले,वैशाली राऊत, अर्चना हिवरकर,मेघना नेवसे,नानी राऊत,सुजाता एकतपुरे,नवले,गारडे, कारंजकर आदी महिला पालक वर्ग उपस्थित होत्या. यावेळी डॉ.एकतपुरे यांनी महिला दिनानिमित्त सर्व उपस्थित महिला वर्गांना आरोग्य,आहार व व्यायामाविषयी मार्गदर्शन केले.

जागतिक महिला दिनानिमित्त शाळेत पाककला स्पर्धा,संगीत खुर्ची स्पर्धा व भाषण स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवर महिलांच्या हस्ते करण्यात आले. जागतिक महिला दिनानिमित्त उपस्थित सर्व महिलांचा शाळेच्या वतीने गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी जागतिक महिला दिनानिमित्त महिला पालकांनी भाषणे केली. शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना कुदळे यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.शाळेचे शिक्षक संतोष कोळी व श्रीमती ए.जी ढगे यांनी सर्वांचे आभार मानले.