शहर

पिंपरी बुद्रुकचे ग्रामदैवत पिरसाहेब यांच्या सभामंडपाचे काम पूर्ण, माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या स्थानिक विकास निधीतून पंधरा लाख

बावडा प्रतिनिधी – मोहंमद कैफ तांबोळी, मोबा. 8378076123

पिंपरी बुद्रुकचे ग्रामदैवत पिरसाहेब ( उदगिरबाबा) यांचा सभामंडप उभारणीसाठी माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या स्थानिक विकास निधीतून पंधरा लाखांचा निधी मंजूर झाला होता. त्यांचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामस्थ व भाविकांना यात्रा काळात चांगली सोय झाल्याने त्यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 पिंपरी बुद्रुकचे ग्रामदैवत सर्वधर्म समभावाचे प्रतीक पिरसाहेब ( उदगिरबाबा) यांना मानणारा भाविक भक्त पंचक्रोशीत मोठ्या प्रमाणात आहे. वर्षाच्या बाराही महिने दर्शन व नवस फेडण्यासाठी सर्वधर्मियांची सतत गर्दि होत असते. लोकनेते कै. महादेवराव बोडकेदादा व सहकारी व पुजारी मंडळ यांनी मागील अनेक वर्षांपासून ग्रामदैवताची यात्रा कोणतेही गालबोट न लागता पोलीस संरक्षणविना शांततेत पार पाडलेल्या आहेत. तीच रूढी परंपरा तरुण मंडळींनी पुढे चालू ठेवली आहे.

लोकनेते महादेवराव बोडके दादा यांनी गावच्या विकास कामासाठी पक्षाच्या माध्यमातून लाखो रुपयांचा निधी आणून विकास कामे केली आहेत. तीच विकास कामांची परंपरा त्यांचे पुतणे माजी सरपंच श्रीकांत बोडके यांनी पुढे चालू ठेवली त्यास सरपंच ज्योती बोडके व उपसरपंच पांडुदादा बोडके यांनी सातत्य ठेवले आहे.

राज्याचे माजी सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ग्रामस्थांच्या विकास कामासाठी लागणारा विकास निधीची मागणी करताच भरभरून दिला आहे. ग्रामदैवत पिरसाहेब यांच्या दर्गाहची उभारणी तत्कालीन सरपंच श्रीकांत बोडके यांच्या कार्यकाळात करण्यात आली आहे. त्यानंतर भाविकांच्या मागणीनूसार माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे मामा यांनी पंधरा लाखांचा निधी देवून दर्गाह समोर सभामंडप उभारणीचे काम पूर्ण केले आहे. तसेच सभामंडपाच्या सभोवताली पेव्हर ब्लॉक टाकून सुशोभीकरण करण्यात येणार असल्याने भाविकांनी व ग्रामस्थांनी माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button