अकलूज येथील हाजी शकुर रसूलसाब बागवान यांच्या वाढ दिवसाच्या निमित्ताने…

आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
अत्यंत परिकुल परिस्थितीत जीवनाची गुजराण करून आपल्या सह दोन्हीं भावंडावर अतोनात प्रेम करत संसाराची गाडी रुळावर आणणारा आणि अगदी लहान वयातच हज यात्रा करणारा माझा मित्र हाजी शकुर याचा आज वाढदिवस…
हाजी शकुर यांच्या आईच्या निधना नंतर एकाकी पडलेल्या वडिलांना त्यांच्या आजारपणात देखील तसू भर हि वेदना पोहचवू न देणारा हाजी शकुर,शकील आणि वसीम यांचे श्रम आपण सगळेच जाणतो…
हाजी शकुर यास वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना माझ्या सह अनेक जणांना आनंद होत असणार आहे,सकाळी सकाळी नाजीम खान यांचा फोन आला,त्यानेच हाजी शकुर याचा वाढदिवस आज असल्याचे आठवण करून देत शुभेच्छा देण्यासाठी जायचे आहे असे बोलणे झाले…
आपल्या आई सह हज यात्रा करणारा आणि तद्नंतर उमराह हज यात्रेचा प्रवास करून आपल्या जीवनात आमूलाग्र बदल करत फक्त घर आणि व्यापारात मग्न असणारा हाजी शकुर हा त्याच्या सम तोच असु शकतो…
सोशल मीडियाच्या या जमान्यात नात्या गोत्याचे संबंध हे मोबाईल पुरते न ठेवता हाजी शकुर याने आपल्या तिन्ही बहिणींच्या परिवारासोबत आपुलकीचे जे नाते निर्माण केले आहे त्याला सुध्दा तोड नाही…
बागवानी व्यापाराची आज झालेली वाताहत आणि त्यात हि सातत्याने टिकून राहणारा व्यापारी म्हणून हाजी शकुर यांची ओळख वाखाणण्याजोगी आहे,मी फक्त अंदाज बांधू शकतो की,आज वाढ दिवसाच्या निमित्ताने हाजी शकुर यांचा मोबाईल किती तरी मित्रांच्या शुभेछा साठी खणखणत असेल…
परिस्थिती मुळे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या माझ्या या मित्राने आपल्या परिवारातील मुलांच्या शिक्षणावर जे नियंत्रण ठेवले आहे ते सुध्दा तारीफे लायक असेच आहे,बागवान समाजात हि मान,मरातब आणि प्रतिष्ठा असलेल्या माझ्या या मित्राला शुभेच्छा देताना मला मनस्वी आनंद तर होतच आहे…
थोडासा चंचल स्वभावाचा असणारा माझा प्रिय मित्र हाजी शकुर याला मनापासून शुभेच्छा…*
🌹🌹🌹💐🌹🌹🌹