आदिवासी एकता परिषदेच्या सहकार्यामुळे पिडीत 6 आदिवासी मुलांवर अत्याचार करणाऱ्या इसमावर ॲट्रॉसिटी अंतर्गत केळवा सागरी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी यांनी केला गुन्हा दाखल

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640
पालघर जिल्ह्यातील केळवा रोड धावंगेपाडा येथील यज्ञेश दत्ता घरत हया इसमाने त्यांच्या घरी चोरी झाल्यच्या संशया वरून धावंगेपाडा गावातील 6 आदिवासी दहावी च्या वर्गात शिकणाऱ्या आदिवासी मुलावर संशय म्हूणन एक एक मुलाला वेगवेगळ्या ठिकाणी बोलावून मारहाण केली. एक मुलाला जोगळे चार रस्ता येथे दुसऱ्या ला स्म्शानभूमीत,तिसऱ्या ला केळवे समुद्र किनारी तर इतरां रस्त्यावर बोलावून मारहाण केली. मारहाण करून दम दिला की सदर घटनेबाबत घरी कोणाला सांगितले पुन्हा मार देईन असे सांगितले. आणि व्हिडीओ बनवून घेतला की त्यांची चोरी केली असे व्हिडीओ रेकॉर्डिंग करून ठेवले.
सदर घटना 26 जानेवारी, तसेच 5-6 फेब्रुवारी असा वेग वेगळ्या दिवसी मारहाण झाली. परंतु भिती पोटी मुलांनी घरात आई वडीलांना घटनेबाबत सांगितले नव्हते. शेवटी सोमवारी एका मुलाने हिम्मत करून आईला 10/02/2025रोजी मारहाणी बद्दल सांगितले. त्या नंतर हा प्रकार उघडकीस आला. दिनांक 11/05/2025 रोजी सर्व पालक 5 मुलांना घेऊन आदिवासी एकता परिषद जिल्हा संपर्क कार्यालय पालघर येथे आदिवासी एकता परिषदेचे डॉ. सुनिल पऱ्हाड, कीर्ती वरठा यांच्या कडे तक्रार घेऊन आले.
घटने ची माहिती घेतल्यानंतर आदिवासी एकता परिषदेने सर्व पिडीत मुलांना घेऊन केळवा सागरी पोलीस ठाणे येथे नेऊन. सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी यांना सदर प्रकरण बाबत सविस्तर माहिती दिली. संबंधित आरोपीवर बाल अत्याचार, मारहाण आणि ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी केली. त्यानुसार केळवा सागरी पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी यांनी तत्काळ कारवाई करत. यज्ञेश दत्ता घरत या इसमावर गुन्हा दाखल केला.
पिडीत मुलांची वैद्यकीय तपास करून औषधं उपचार करण्यात आले. या वेळी आदिवासी एकता परिषदेचे डॉ. सुनिल पऱ्हाड आदिवासी एकता परिषदेच्या केंद्रीय अध्यक्ष मंडळ सदस्य किर्ती निलेश वरठा, जिल्हा सह सचिव पौर्णिमा परेड, तालुका सचिव जयेश मोरे, सहसचिव संदीप आंबात, तालुका महिला संघटक मोहिनी खरपडे, पिंटू बसवत, देवराम परेड, रुपेश धापशी, सचिन मालकरी,पीडित मुलांचे पालक, केळवा उप सरपंच राजेश सालकर, जयेश वांगड असे अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.