सफाळे केळवा रोड येथे आगरी समाज भवन सभागृहाचे उदघाटन आमदार राजेंद्र गावीत यांच्या हस्ते

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640
आगरी समाज सेवाभावी संस्था केळवारोड आगरी समाजाच्या सामाजिक संस्थेमार्फत लोकवर्गणीतून केळवारोड पश्चिम येथे आगरी समाज भवन सभागृह बांधण्यात आले असून सदर सभागृहाचे उदघाटन रविवार दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी आमदार राजेंद्र गावीत यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

या कार्यक्रमांस प्रमुख अतिथी म्हणून आगरी समाजातील वास्तुविशारद परेश घरत उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना पालघर जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने पालघर तालुक्यात आगरी समाज मोठा समाज असून समाजाच्या नावात जरी आग असली तरी तितकाच प्रेमळ आहे आणि दिल्या शब्दाला जगणारा समाज आहे. समाजाची उत्तरोत्तर प्रगती होत असून समाजातील तरुण पिढी उच्चशिक्षण घेत असून चांगल्या हुद्दावर पोचले आहेत.आगरी समाज सेवाभावी संस्थेने समाजासाठी या सभागृहाच्या माध्यमातून हक्काचे व्यासपीठ निर्माण केले आहे असे आमदार राजेंद्र गावीत यांनी प्रतिपादन केले.
या कार्यक्रमानिमित्त समाज भगिनींचा हळदीकुंकू समारंभ तसेच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाला आगरी समाजातील नामवंत मंडळी, विविध गावचे सरपंच, व्यावसायिक, संस्थेचे सर्व पदाधिकारी, सदस्य, देणगीदार सभासद आणि महिलांची मोठी उपस्थिती होती.
संस्थेचे अध्यक्ष महादेव घरत यांच्या अध्यक्षते खालील सदर कार्यक्रम पार पडला. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सहकार्यवाह दत्ता भोईर यांनी केले तर माजी कार्यवाह जयप्रकाश म्हात्रे , मोरेश्वर घरत , योगेश पाटील’, पाडूंरंग किणी’,.चेतन गावड, रामदास पाटील, माजी सल्लागार राजन घरत यांनी आपले समाजाप्रती मनोगत व्यक्त केले .अतिशय सुंदर आणि दिमाखदार शब्दांमध्ये निखिल राजन घरत कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक हेमंत पाटील , कल्पेश घरत यांनी सुंदर शब्दात सूत्रसंचालन केले. कल्पेश घरत यांनी आभारप्रदर्शन केले.