शेती महामंडळं कामगारांना दोन गुंठे रहाण्यासाठी जागा देण्याचे पालकमंत्री विखे पाटील यांचे आश्वासन हवेत विरले

बी.टी.शिवशरण
महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ कामगारांना ते रहात असलेली शेती महामंडळाची जागा प्रत्येक कुटुंबाला किमान दोन गुंठे जागा रहान्या करिता देण्याबाबत सरकारचा विचार असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गेल्या सहा महिन्या पूर्वी श्रीपूर येथे एका कार्यक्रमात दिले होते मात्र सहा महिने होत आले तरी अद्याप याबाबत कोणतीही हालचाल अथवा शासनाचा अध्यादेश निघाला नाही राज्यातील शेती महामंडळ शासनाने करार पद्धतीने खाजगी कंपनी किंवा लोकांना भाडे तत्वावर करायला दिली आहे
मात्र महामंडळ चालू होते तेव्हा कर्मचारी कामगार महामंडळाच्या जागेत रहात होते ते आजपर्यँत जवळपास गेली साठ वर्षे ते कायमस्वरूपी पत्राशेड मारून रहात आहेत त्यांना स्वतःचे पक्के बांधकाम करता येत नाही स्वछतागृह बांधता येत नाही किंवा शासनाच्या कोणत्याताच योजना सुविधा यांचा लाभ घेता येत नाही या सर्व सारासार बाबी लक्ष्यात घेतल्या तर महाराष्ट्र शासनाचा अंगीकृत उपक्रम असलेले शेती महामंडळ जवळपास बंद पडल्यात जमा आहे
राज्यातील हजारो कुटुंबाचा रहाण्याचा मोठा प्रश्न गुतागुंतीचा बनला आहे या सर्वांचा विचार करुन महसूलमंत्री यांनी कामगारांच्या जागेचा प्रश्न यात लक्ष घातले आहे पण त्यांनी घोषणा केली जागा रहाण्यासाठी देण्याची भूमिका मांडली शेती महामंडळ जागेत रहात असलेल्या हजारो कुटुंबाला आनंद झाला परंतु घोषणा आश्वासने पहाता कालावधी निघून जात आहे निर्णय अंमलात कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे



