अकलूज येथील थोर “स्वातंत्र्य सैनिक” स्व हाजी समशेरभाई हुसैनभाई चौधरी यांच्या जयंतीच्या निमित्ताने…

आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
हाजी समशेरभाई चौधरी म्हणजे अकलूजच्या मुस्लिम चळवळीतील एक महत्वाचे नाव,28 फेब्रुवारी 1902 रोजी पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे त्यांचा जन्म झाला होता,घरची परिस्थिती बेताची,समशेर भाई यांच्या वडिलांचा इंदापूर येथे मोठा व्यापार होता आणि जोडीला शेती सुध्दा,एकुलते एक अपत्य असणाऱ्या छोट्या समशेर ला त्यांच्या वडिलांनी शिक्षणासाठी पुणे येथे पाठविण्याचा निर्णय घेतला आणि साधारण पणे 1919 साली “संस्कृत” या विषयात प्रावीण्य मिळवित समशेर भाई यांनी तेंव्हाची मॅट्रिक पूर्ण केली आणि इंदापूर गाठले…
करकंब येथील एका धनाढ्य बागवान परिवारातील “अशरफ बी” या मुली बरोबर त्यांचा विवाह सोहळा थाटामाटात झाला होता,समशेर भाई वर आता कौटुंबिक जबाबदारी येऊन पडली होती तो पर्यंत समशेर भाई हे इंदापूर नगर पालिकेचे “मुन्सिपल कौन्सलर” झाले होते तर इकडे शेती आणि व्यापारात सुध्दा त्यांचा चांगला जम बसू लागला होता आणि माशी कुठे शिंकली कुणास ठाउक समशेर भाई यांनी इंदापूर हून अकलूज येथे हिजरत (वास्तव्य) करत पुन्हा एकदा संसाराची घडी बसवण्याचा प्रयत्न चालू केला…
अकलूज येथे वास्तव्यास येई पर्यंत दोन मुली आणि दोन मुले असा त्यांच्या संसाराचा भाग होऊन बसला होता,अशातच समशेर भाई यांनी अकलूज येथील पोस्ट ऑफीस जवळ आपले स्टॅम्प व्हेंडर चे कामकाज सुरू केले होते,हाजी समशेर भाई हे ज्योतिष शास्त्राचे सुध्दा गाढे अभ्यासक होते…
1942 च्या स्वातंत्र्य लढ्यात हि त्यांचा मोठा सहभाग होता,”स्वातंत्र्य सैनिक” म्हणून त्यांनी काही काळ तुरुंगवास हि भोगला होता,भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले,अकलूज सारख्या तत्कालिन दुर्गम भागात युवकांची एक फळी निर्माण करून देश हिता साठी लढण्याचे सामर्थ निर्माण करून इंग्रजांना “हम भी कुछ कम नहीं है” हे दाखवून दिले…
1962 साली माळशिरस तालुक्यातून सौदी अरेबिया येथील इस्लाम धर्मातील पवित्र अशा मक्का आणि मदिना येथे जाऊन हज यात्रा करणारे हाजी समशेर भाई हे “पहिले हाजी” होते,विशेष म्हणजे त्या काळी हज यात्रेचा प्रवास हा समुद्री मार्गाने होत असे,दूरदृष्टी असलेले हाजी समशेर भाई चौधरी आपल्या कुशाग्र बुध्दी मुळे जनमानसात “हाजी साहेब” म्हणून प्रसिध्द होते…
थोर राजकारणी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या बरोबर त्यांचे स्नेहाचे नाते आत्तपर्यंतच्या त्यांच्या तिसऱ्या चौथ्या पिढी पर्यंत अबाधित आहे हे विशेष,अकलूज येथील बागवान मशीद असो किंवा ऐतिहासीक “विजय चौक” येथील दर्गा मशीद असो येथील सर्व मुस्लिम समाज बांधवांना अनेक वर्षे मार्गदर्शन करण्याचे काम हाजी समशेर भाई चौधरी यांनी केले…
आजच्या घडीला हाजी समशेर भाई चौधरी यांच्या कुटुंबातील त्यांची थोरली मुलगी असलेल्या हजन स्व बिस्मिल्ला बी मोहोळकर आणि त्यांचे चिरंजीव स्व अमीरहमजाभाई चौधरी तसेच स्व हाजी फक्रोद्दीनभाई चौधरी यांचे कुटुंब अकलूज येथे गुण्या गोविंदाने राहत असुन हाजी समशेर भाई चौधरी यांची धाकटी मुलगी राहमत बी या आपल्या परिवारासह सध्या बारामती येथे वास्तव्यास आहेत…
“बजमे अनवारे सोफिया” चे ट्रस्टी आणि “जाणते राजे” जयसिंह मोहिते पाटील यांचे विश्वासू सहकारी असलेले हाजी जहांगीर शेठ अमीरहमजा चौधरी,स्व हाजी अय्युबभाई अमीरहमजा चौधरी,शहाजहान अमीरहमजा चौधरी,रियाजअहमद हाजी फक्रोद्दीनभाई चौधरी,इम्तियाज हाजी फक्रोद्दीनभाई चौधरी,निसारअहमद हाजी फक्रोद्दीनभाई चौधरी हे हाजी समशेरभाई चौधरी यांचे नातूच…
लोकहित वादी,मवाळ स्वभावाचे आणि अत्यंत हुशार बुद्धीचे थोर स्वातंत्र्य सैनिक हाजी समशेर भाई चौधरी यांचे निधन 1987 साली झाले,आज हि एखाद्याला स्टॅम्प व्हेंडर ची गरज पडल्यास आपसूकच त्यांच्या तोंडातून समशेर भाई यांचेच नाव येते,माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे खंदे समर्थक असलेले हाजी जमीर चौधरी आणि टाइम्स 9 चे पत्रकार आमीर मोहोळकर हे हाजी समशेर भाई चौधरी यांचे “पणतू” आहेत हे मात्र विशेषच…



