महाराष्ट्र

अकलूजमध्ये नात्यांचा उत्सव सोहळा९७ नाती व नातू करणार वडिलधाऱ्यांचा सन्मान

उपसंपादक——–हुसेन मुलाणी टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448

अकलूज – शनिवार दि. २७ मे २०२३ रोजी अकलूजमध्ये एका अनोख्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ५ आजी, त्यांची २७ मुलं मुली, त्यांचे ९७ नातू. हे ९७ नातू मिळून ५ आजींच्या हयात असलेल्या मुला मुलींचा म्हणजेच आपल्या वडिलधाऱ्यांचा सन्मान करणार आहेत. आणि या सन्मान सोहळ्यासाठी आजींच्या गोतावळ्यातील सुमारे दिड हजार पाहुणे व नातेवाईक उपस्थित राहणार असल्याची माहिती ज्यांच्या संकल्पनेतून हा सन्मान सोहळा साकार होतोय ते महेश सुर्यवंशी यांनी अकलूज येथे पत्रकार परिषदेत दिली.

या सन्मान सोहळ्याविषयी सांगताना महेश सुर्यवंशी म्हणाले, आमच्या ५ आजी म्हणजेच कै. जानकाबाई सुरवसे (सांगोला), कै. तानुबाई वडतिले (सोलापूर), कै. अंबुबाई सूर्यवंशी (अकलूज), कै. सत्यभामा वडतिले (सोलापूर) व कै. कृष्णाबाई किसन वडतिले (अकलूज) या आमच्या मुळ आधारस्तंभ होत्या. थोरल्या कै. जानकाबाई यांना ३ मुली व १ मुलगा. त्यातील २ मुली व १ मुलगा मयत आहे. कै. तानुबाई यांना २ मुली व २ मुले. त्यापैकी १ मुलगा मयत आहे. कै. अंबुबाई यांना ३ मुले व ३ मुली. त्यापैकी १ मुलगा व १ मुलगी मयत आहे. कै. सत्यभामा यांना ३ मुले व ६ मुली. त्यापैकी २ मुली व १ मुलगा मयत आहे. कै. कृष्णाबाई यांना ३ मुले व १ मुलगी आहे.

या आमच्या २७ वडिलधाऱ्यांपैकी आज १८ व्यक्ती जिवंत आहेत. त्यांना एकूण ९७ नाती व नातू आहेत. या ९७ नाती व नातूंना आजीच्या गोतावळ्यातील पै-पाहुण्यांची, नातेवाईकांची ओळख व्हावी, आपल्या वडिलधाऱ्यांनी आपल्यासाठी किती कष्ट उपसले याची माहिती व्हावी याकरीता सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. गत १५० वर्षात झालेल्या ५ पिढ्यांचा लेखा जोखा या कार्यक्रमात मांडण्यात येणार आहे.

या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विजयसिंह मोहिते-पाटील, नंदिनीदेवी मोहिते-पाटील, चंद्रपुरचे आमदार किशोरभाऊ जोरगेवार, धैर्यशील मोहिते-पाटील, शितलदेवी मोहिते-पाटील, किशोरसिंह माने-पाटील, राजेंद्र सुर्यवंशी, महंत शामनाथजी योगी महाराज, विकासशेठ नागे, शामलाताई सोनवणे, पांडुरंग करपे, चंद्रशेखर सूर्यवंशी, दिपक सुर्यवंशी, पांडुरंग सुरवसे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सकाळी ११ वाजता स्वयंवर मंगल कार्यालय अकलूज येथे हा सोहळा साजरा होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button