“मुस्लिम” समाजाने श्रीमंतीचे प्रदर्शन थांबवायलाच हवे. — इकबाल मुल्ला (पत्रकार) सांगली

उपसंपादक—– हुसेन मुलाणी टाईम्स. 9 मराठी न्यूज नेटवर्क मो :- 97 30 867 448
, मुस्लिम समाजाने श्रीमंतीचे प्रदर्शन थांबवायलाच हवे केवळ अल्लाह साठी कुर्बानी करायची असेल तर “एक वर्ष ” पूर्ण झालेल्या लहान बकऱ्यांची पण होते की नाही ??? 75 हजार , 1 लाख , 2 लाख रुपयांचा एकच आणून ,त्याचे जाहीर प्रदर्शन करून ज्यांनी लहान बकरा घेतला आहे ,त्यांना. खिजवण्यात “काय अर्थ ? कित्येक ठिकाणी असे प्रकार घडताना दिसत आहेत ,ही दुर्दैवाची बाब आहे .
आज मुलांसाठी. ,विद्यार्थ्यांसाठी शिक्षण हे महत्वाचे व टर्निग पॉईंट असताना , मुलांना शाळेत ,कॉलेज मध्ये न घालता ,चांगला क्लास न लावता ,जर कोणी आपल्या दुकानात – कारखान्यात त्या लहान मुलांना “जुंपत” असेल आणि दिखाव्यासाठी” बकरी ईद” दिवशी 1 लाख रुपयांचे बोकड आणत असेल तर त्याचा काय फायदा ?
जर परमेश्वराने तुम्हाला धनदौलत दिली आहे ,तर त्या एक लाख रुपयांच्या बोकडा ऐवजी 2 बकरे घेऊन ,त्यातील उरलेल्या पैशात गरजवंत लोकांना दानधर्म करा ..तुम्हाला निश्चित पुण्य लाभेल एक-दोन लहान बकरे घेऊन , पुण्य मिळवून ,राहिलेल्या पैशात गरजवंत – शैक्षणिक – आरोग्य ,मुलींचे मोफत मद्रसे क्षेत्रात तुमचा पैसा गेला तर यासारखे मोठे “पुण्य” नसावे .

आज महाराष्ट्रात बकरी ईद च्या माध्यमातून किमान 1000 कोटी रुपयांची बकऱ्यांची उलाढाल होते . समजा ,सर्व श्रीमंत मुस्लिमांनी “विधायक दृष्टीकोन” ठेऊन बकरे कमी केले तर किमान 200 कोटी रुपयांची बचत. होईल .आणि सर्व मुस्लिम ते पैसे. विधायक. कार्यात खर्च करू शकतात . हे सर्व होण्यासाठी उदात्त दृष्टिकोन हवा ..उच्च विचारसरणी हवी .
ईद -अल -अजहा. .अर्थात बकरी ईद दिवशी कुर्बानी दिली जाते .सर्वशक्तिमान अल्लाह ला प्रसन्न करण्यासाठी हे प्रयोजन असते .अल्लाह जवळ त्या “कुर्बानी “चे मटण मिळत नाही तथापि त्या व्यक्तीची जी मनोकामन आहे ती पाहिली जाते .
तात्पर्य कुर्बानी प्रतिष्ठेसाठी नाही ,तर अल्लाह च्या ” इबादत ” (भक्ती )साठी केली जाते .
कुर्बानीचे 3 भाग होतात .त्यातील 2 भाग गोरगरीब -नातेवाईक -मित्र परिवार यांना द्यायचे असतात .असो ,
जर कोणी केवळ दिखाव्यासाठी बकरी ईद दिवशी मोठे बकरे आणत असतील तर त्याचे पुण्य खचितच मिळणार नाही. कारण दिखावा सर्वशक्तिमान अल्लाह ला पसंत नाही . सर्व मुस्लिम बांधव याबाबत “गांभीर्याने”” विचार करतील ही आशा आहे .धन्यवाद !
आ .इकबाल मुल्ला ( पत्रकार) संपादक -सांगली वेध ,
संपादक -वेध मीडिया न्यूज ,सांगली .
मोबाईल – 8983587160



