“शाहीन फाउंडेशन” चा तीसरा ऐतिहासिक सामुदायिक विवाह सोहळा 26 जाने 2025 रोजी…

🎯 विवाहासाठी नांव नोंदणी सुरू झाली असल्याचे “शाहीन फाउंडेशन” ने केले जाहीर…
आमीर मोहोळकर
टाईम्स 9 न्युज नेटवर्क,अकलूज
9890299499
शहेनशाह ए सोलापूर “शाहजहुर अली” आणि थोर हुतात्म्यांची पावन भूमी म्हणून ओळख असलेल्या ऐतिहासिक सोलापूर शहरात “शाहीन फाउंडेशन” आयोजीत भव्य सामुदायिक विवाह सोहळा पार पडणार आहे,यंदाचे हे त्यांचे 3 रे वर्षे असुन पहिल्या वर्षी 33 तर गेल्या वर्षी शाहीन फाउंडेशन ने साठ (60) जोडप्यांची विवाह गाठ बांधुन नावलौकिक मिळवला होता अशी माहिती फाऊंडेशन चे अध्यक्ष उमर भाई (M राऊंड) यांनी दिली,ते टाईम्स 9 न्युज नेटवर्क चे अकलूज प्रतिनिधि आमीर मोहोकर यांच्याशी बोलत होते…

शाहीन फाउंडेशन आणि सामाजिक काम हे एक समीकरणच बनले असून गेल्या वर्षी च्या तुलनेत या वर्षी सुद्धा फाउंडेशन ने आपले सामाजिक कर्तव्य,सामाजिक भान ठेवत,समाजाच्या प्रत्येक चौकटीतून जात हा सोहळा कसा यशस्वी पार पडेल यावरच भर दिला असुन,कसलाही मोठेपणा न करता फक्त समाजाच्या प्रत्येक घटकासाठी याचा कसा फायदा होईल हे एकच उद्दिष्ठ समोर ठेवत शाहीन फाउंडेशन चे अनेक “सरदार” आपली आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी सज्ज झाले आहेत…
सदर विवाह सोहळ्या चे एक वैशिष्ट असे की,प्रत्येक वधू वरासाठी त्यांना लागणाऱ्या सर्व संसार उपयोगी वस्तू भेट देण्यात येत असतात तसेच वधु वरा तर्फे आलेल्या सर्व पाहुण्याची जेवणाची व्यवस्था चोख करण्यात येत असते,हा ऐतिहासिक विवाह सोहळा एम ए पानगल स्कूल मैदान,सिद्धेश्वर पेठ,(जिल्हा न्यायालय जवळ) येथे दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी संध्याकाळी 5 वाजता गोरज मुहूर्तावर पार पडणार असुन या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्यासाठी आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत अशी माहिती हि शाहीन फाउंडेशन चे अध्यक्ष हाजी उमर भाई (M राऊंड) यांनी दिली…

बारा इमाम चौक,कशिश बुरखा हाऊस च्या शेजारी M राऊंड यांच्या ऑफीस जवळ विवाह नोंदणी सुरू झाली असुन इच्छुकांनी अध्यक्ष :- M उमरशरीफ 9623232290,कार्यकारिणी अध्यक्ष :- राजा बागवान 9049045152 आणि इब्राहीम शेख 9766105355 या मोबाईल नंबर शी संपर्क करण्याचे आवाहन हि “शाहीन फाउंडेशन” च्या वतीने करण्यात आले…



