पूजा दुबे हिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तिच्या होणाऱ्या नवऱ्यासह सासरा व अन्य 2 अशा एकूण 4 जणांविरुद्ध नालासोपारा तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल.

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640 पालघर जिल्हा वृत्तांत.
नालासोपारा येथील (25) वर्षीय पूजा दुबे हिचा मृतदेह रविवार दिनांक 13 ऑगस्ट 2023 रोजी पश्चिम रेल्वेच्या वैतरणा स्टेशन खाडीजवळ केळवा सागरी पोलिसांच्या हाती सापडला होता. याबाबत नालासोपारा तुळींज पोलीस ठाण्यात तिच्या आत्महत्येस जबाबदार असलेला तिचा होणारा नवरा आणि नवऱ्याच्या बापा सह अन्य 2 अशा एकूण 4 जणांविरुद्ध नालासोपारा तुळींज पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नालासोपारा येथे राहणारी (25) वर्षीय पूजा रत्नाकर दुबे ही गेल्या तीन दिवसापासून घरातून बेपत्ता होती. याबाबत तिच्या आई-वडिलांनी नालासोपारा तुळींज पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल केली होती.
पूजा रत्नाकर दुबे हिचा मृतदेह रविवार दिनांक 13 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी केळवा सागरी पोलिसांच्या हाती सापडला होता. याबाबत अधिक तपास व चौकशी करून तिचा मृतदेह केळवा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड आणि उपपोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी तिच्या कुटुंबियांकडे सोपवला होता.
याबाबत मुलीच्या नातेवाईकांनी पूजा दुबे हिच्या आत्महत्येस जबाबदार तिचा होणारा नवरा आहे असे सांगितल्यावर नालासोपारा तुळींज पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अधिक चौकशी केली असता तिच्या आत्महत्येस जबाबदार तिचा होणारा नवरा आणि नवऱ्याचे वडील यांच्यासह अन्य 2 अशा 4 जणांविरुद्ध रविवार दिनांक 13 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी नालासोपारा तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.



