अकलूजच्या “ॲपेक्स” हॉस्पिटलमध्ये मोफत बाल हृदयरोग शिबीर…

आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
अकलूज येथील ॲपेक्स हॉस्पिटल येथे शुक्रवार १७ जाने रोजी मोफत हृदय शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती टाइम्स 9 न्यूजच्या सुत्रांनी दिली,तरी गरजूंनी या संधीचा लाभ घ्यावा,असे आवाहन ॲपेक्स हास्पिटल चे प्रेसिडेंट डॉ राजीव राणे यांनी केले…

ॲपेक्स हॉस्पिटल आणि विश्वराज हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात सहभागी रुग्णांची व जन्मजात हृदयरोग असणार्या रुग्णांची तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व ईसीजी मोफत काढण्यात येणार असून २-डी इकोकार्डियोग्राफी साठी मात्र माफक शुल्क आकारण्यात येणार आहे…
हृदयाच्या शस्त्रक्रिया शिबीरात विश्वराज हॉस्पिटल चे बालहृदयरोग तज्ञ डॉ आशिष बनपूरकर,ॲपेक्स हॉस्पिटलचे बालरोग तज्ञ डॉ राजीव राणे,शिशुपाल रोग तज्ञ डॉ मनिष राणे हे रुग्णांची तपासणी करणार आहेत…

या शिबिरात हृदयाला छिद्र असणे,छिद्र डिव्हाईसच्या साहाय्याने बंद करणे यासह सर्व प्रकारच्या हृदयाच्या शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती हि टाइम्स 9 न्यूज च्या सुत्रांनी दिली…