इराण आणि इस्रायल युद्धामुळे सफरचंदची आवक घटली – एजाज बागवान

आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
आपल्या येथे काश्मीर आणि शिमला येथील सफरचंदचा सिझन आटोक्यात आल्यानंतर इराण येथील सफरचंदला जोरदार मागणी असते,परंतु या वर्षी इराण आणि इस्रायल युद्धामुळे भारतात येणारी सफरचंदची आवक घटल्याने ग्राहकांना या वर्षी सफरचंद जवळ जवळ दोनशे ते अडीचशे रुपये प्रति किलो मिळण्याची दाट शक्यता नाकारता येत नसल्याची बाब अकलूज येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील मार्केट यार्डातील व्यापारी एजाज बागवान यांनी बोलून दाखवली…
पुढे बोलताना एजाज बागवान यांनी असे सांगितले की,काश्मिर आणि शिमला येथील देशी सफरचंद चा मौसम या वर्षी लवकरच आटोक्यात आल्याने घाऊक व्यापार्यामार्फत ग्राहकांनी इराण येथील सफरचंदची मागणी केलेली असताना इराण येथे सुरु असलेल्या युद्धामुळे माल वेळेवर पोहचू शकत नसल्याने सफरचंद महाग होण्याची चिंता हि त्यांनी बोलून दाखवली…

सध्या अकलूज,बारामती,पंढरपूर, सोलापूर,सांगोला येथे प्रती दिन दोन ते तीन टन सफरचंद विक्री केली जाते,परंतु युद्धजन्य परिस्थिती अशीच कायम राहीली तर त्याचा परिणाम फळ व्यापार आणि व्यापारी यांच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही अशी भीती हि त्यांनी बोलून दाखवली…
इराणचे सफरचंद शरीरासाठी अती उपयुक्त ऊर्जादायी असल्याने आणि काश्मिर,शिमला येथील सफरचंद पेक्षा जास्त मागणी इराण येथील सफरचंदची असल्याने या वेळेस आंतरराष्ट्रीय पातळीवर “नेमकं घडतंय काय”…? हेच बघत बसण्याची वेळ मात्र आपल्या येथील व्यापारावर आली आहे हे मात्र तितकेच खरे…