शहर

पालघर जिल्ह्यातील सफाळे तांदुळवाडी डोंगरपाडा गावातील एका (6) वर्षाच्या मुलीवर केला (13) वर्षाच्या मुलाने अतिप्रसंग

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640

पालघर जिल्ह्यातील सफाळे हद्दीतील तांदुळवाडी जंगलात एका (6) वर्षाच्या मुलीवर (13) वर्षाच्या मुलाने अतिप्रसंग केल्याची घटना रविवारी सफाळे तांदुळवाडी डोंगरपाडा गावात घडली आहे.

पालघर जिल्ह्यातील सफाळे तांदूळवाडी डोंगरपाडा गावातील ही (6) वर्षाची मुलगी खेळत असताना तिच्याच शेजारी राहत असलेल्या (13) वर्षाच्या मुलाने या मुलीला मच्छी पकडण्याच्या बहाण्याने तांदुळवाडी डोंगरीपाडा ओहोळाच्या बाजूला असलेल्या वन विभागाच्या जंगलात नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केला.ही घटना रविवार दिनांक 11 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9.30 ते 11 या दरम्यान घडली आहे.

घटनास्थळी पालघर उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर यांनी भेट दिली असून याबाबत पुढील तपास सफाळे पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक अविनाश मांदले यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक प्राजक्ता पाटील करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button