शहर

मोहिते पाटील गटाचे “निष्ठावंत” कार्यकर्ते लालासाहेब अडगळे आज “शिवरत्न” वर करणार उमेदवारीची मागणी…

🎯 शेकडो कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्यता,जनतेतूनही होतेय उमेदवारीची मागणी…

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी आयुष्याचा नवा प्रवास सुरू करतोय आणि माझ्या राजकीय वाटचाली वर पहिलं पाऊल टाकत आहे,ते हि तुमच्या सारख्या असंख्य अकलूजकरांच्या विश्वासाने…

युवा अवस्थेत पदार्पण केल्या पासून ते आज स्वतःला उमेदवारी मागण्यासाठी मोहिते पाटील परिवाराला शिवरत्न येथे भेटतोय तुमच्याच साक्षीने…

म्हणूनच म्हणतोय “यावं लागतंय”,माझ्यासाठी आणि विकासाची परंपरा पुढे नेण्यासाठी…

आज सायंकाळी ५ वाजता “शिवरत्न” येथे “अजातशत्रू” विजयसिंह मोहिते पाटील यांच्या सह त्यांच्या परिवारातील सदस्यांना भेटून अकलूज नगरपरिषद निवडणुकीत संधी मिळावी म्हणून आपल्या साक्षीने विनंती करणार आहे…

गेली अनेक वर्षे मोहिते पाटील परिवारासह “एकनिष्ठ” राहून “निष्ठावंत” कार्यकर्ता म्हणून मिळवलेली ओळखच माझी संधी आहे,या साठी तुमची उपस्थिती माझ्यासाठी अत्यंत महत्वाची आहे…

अकलूजची मायबाप जनता,तुमचा आशीर्वाद,तुमची साथ आणि तुमची उपस्थिती हिच माझी खरी ताकद आहे.

या नव्या प्रवासाला तुमचं प्रेम मिळालं,तर माझा उत्साह द्विगुणित होईल, आणि माझं ध्येय अधिक मजबूत बनेल.

चला,तर मग एक “अकलूजकर” म्हणून भेटूया,अकलूजच्या विकासासाठी,आपल्या मातीच्या मानासाठी आणि आपल्या स्वाभिमानाच्या नव्या अध्यायासाठी…

आपला
श्री.लालासाहेब अडगळे
अकलूज

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button