शहर

डहाणू मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विनोद मेढा यांच्या प्रचार सभेसाठी… उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस डहाणूत दाखल.. शेतकऱ्यांना दिले वीज मोफत देण्याचे आश्वासन

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640

महाविकास आघाडी आणि डाव्या पक्षांवर जोरदार टीका करून लाल बावटा उतरू खाली आणि भगवा आणि वरती अशी गर्जना करत आमच्या सरकारने महाराष्ट्र राज्यात एक कृषी वीज कंपनी स्थापन करून

ही कंपनी शेतीसाठी वीज निर्माण करणार आहे आणि ही निर्माण केलेली वीज महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना पुढची पाच वर्ष मोफत देण्यात येईल

तसेच वाढवण बंदर तयार करून पालघर जिल्हा महाराष्ट्र राज्याचे विकासाचे इंजन होईल अशी घोषणा आणि दाव्यासह आश्वासन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर जिल्ह्यातील डहाणू विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विनोद मेढा यांच्या प्रचारासाठी पालघर येथे मंगळवार दिनांक 12 नोव्हेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलताना मतदारांना दिले आहे .

यावेळी पालघर जिल्हा पालकमंत्री रवींद्र चव्हाण, पालघर जिल्हा भाजप अध्यक्ष भरत राजपूत, भाजप महिला प्रदेश सचिव राणी दिवेदी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार आनंद भाई ठाकूर, गुजरात आमदार अरविंद भाई पटेल, नरेश पटेल, आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष सुरेश जाधव, पंकज कोरे, प्रशांत संखे, विना देशमुख जगदीश राजपूत, निमिल गोयल, अरुण माने, नंदन वर्तक या मान्यवरांसह संपूर्ण पालघर जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button