शहर

नऱ्हे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी हनुमंत वीर तर उपसरपंच पदी जनाबाई गोळे

भोर प्रतिनिधी दत्तात्रय बांदल

भोर तालुक्यातील भाटघर धरणाच्या किनारी वसलेल्या नऱ्हे गावच्या सरपंचपदी हनुमंत काशिनाथ वीर तर उपसरपंचपदी सौ.जनाबाई शैलेश गोळे यांची निवड झाली. नुकतीच निवड झाल्याबद्दल सरपंच हनुमंत वीर व उपसरपंच जनाबाई गोळे यांच्यासह सदस्य किशोर भगवान गोळे, नीता विकास गोळे, अरुणा दत्तात्रय गोळे, बाळासाहेब बापूराव गोळे यांचा सत्कार करण्यात आला.

यादरम्यान भोर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शैलेश सोनवणे, तंटामुक्ती कमिटीचे अध्यक्ष नामदेव धोंडीबा गोळे, एकनाथ वीर, मा.सरपंच शांताराम वीर, ज्ञानेश्वर गोळे तसेच अंकुश वीर, सुरेंद्र वीर, अर्जुन गोळे, कोंडीबा वीर, नंदराज गोळे, विश्वनाथ गोळे, सुदाम गोळे, पांडुरंग गोळे, प्रकाश गोळे, संजय गोळे, गजानन वीर, मयूर वीर, तानाजी वीर, उमेश वीर, शिवाजी वीर, विकास गोळे, साहेबराव गोळे, शैलेश गोळे, प्रशांत वीर, साईराज वीर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button