खासदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते अर्नाळा किल्ला गावात प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनांचे भूमिपूजन संपन्न

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
पालघर जिल्हा प्रतिनिधी
विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनेनुसार जल जीवन मिशन अंतर्गत हर घर नल हर घर जल ही योजना गावांसाठी केंद्र सरकारकडून मंजूर झाली आहे.

या योजनेचे भूमिपूजन अर्नाळा किल्ला येथे खासदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक 08 मार्च 2024 रोजी संपन्न झाले.अर्नाला किल्ला व सात गावे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेचा लाभ अर्नाळा किल्ला, टेंभी, कोल्हापूर, आकटन, तरखड, कळंब, रानगाव, व खरडी दोळीव या गावांना मिळणार आहे.

अर्नाळा किल्ला गाव हे बेटावर असल्यामुळे आज पर्यंत तेथील नागरिकांना पाण्यासाठी खूप कष्ट करावे लागत होते.पण आता त्यांची पाण्याची समस्या कायमची सुटणार आहे.त्या बाबत ग्रामस्थांनी खासदार यांचे आभार व्यक्त केले आहेत.सदर कार्यक्रमात श्रीमती पूजा मेहेर- सरपंच, श्रीमती आशा चव्हाण जिल्हा परिषद सदस्य, तसेच . महेंद्र पाटील. मनोज पाटील, कपिल म्हात्रे, विजय मेहेर आदी पदाधिकारी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.



