नकली चेकिंग तिकीट मास्टरवर ( टीटी )पालघर रेल्वे पोलिसांची कारवाई

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
गुजरातहून मुंबईकडे जाणाऱ्या मेल एक्सप्रेस मध्ये एका नकली तिकीट चेकिंग मास्टरवर ((टीटी ) पालघर रेल्वे पोलिसांनी कारवाई केली आहे किरण सोलंकी राहणार मुंबई घाटकोपर असे या डुप्लिकेट तिकीट चेकिंग मास्टरचे नाव आहे हा डुप्लिकेट टिकिट चेकिंग मास्टर (टीटी ) गुजरातहून मुंबईकडे जाणाऱ्या 19015 या सुरत बोरीवली गाडीमध्ये बसलेल्या प्रवाशांकडे शनिवार दिनांक 19 जुलै रोजी रेल्वे तिकिटांची तपासणी करत होता.

यावेळी ऑन ड्युटी रेल्वेचे चेकिंग तिकीट मास्टर श्याम किरण प्रसाद यांनाही बाब लक्षात आल्यावर त्यांनी रेल्वे पोलिसांच्या मार्फत या डुप्लिकेट तिकीट चेकिंग मास्टरला डहाणू रेल्वे स्थानकात उतरून त्याला डहाणू रेल्वे स्थानकावर ड्युटीवर असलेले डहाणू रेल्वे पोलीस उपनिरीक्षक अरुण कुमार शर्मा व तिकीट चेकिंग मास्टर राहुल कुमार व प्रशांत यादव यांच्या ताब्यात दिल्यावर त्यांनी त्यांची कसून तपासणी करून पालघर पोलिसांच्या ताब्यात दिले असता पालघर रेल्वे पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली आहे .याबाबत अधिक तपास पालघर रेल्वे लोहमार्ग पोलीस उपनिरीक्षक पळवल करत आहेत



