बळीराजावरील संकटे दुर होऊ दे, शेतशिवार फुलून शेतमालाला चांगला भाव मिळून जिवनात सुख समृद्धी लाभु दे.- माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे श्री लक्ष्मी नृसिंह चरणी साकडे

बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी, मोबाईल – 8378076123
बळीराजावरील संकटे दुर होऊ दे, पाऊस पाणी चांगले पडू दे, शेतशिवार फुलून शेतमालाला चांगला भाव मिळून जिवनात सुख समृद्धी लाभू दे असे माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी श्री लक्ष्मी नृसिंह चरणी साकडे घातले.
श्री नृसिंह नवरात्रोत्सव निमित्ताने माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान मंदिरात येवून अभिषेक घालून प्रार्थना केली. श्रीकांत दंडवते, चंद्रकांत सरवदे, श्रीकांत बोडके, नरहरी काळे, विठ्ठल देशमुख, सतीश काकडे, अरूण क्षिरसागर, दशरथ राऊत, दत्तात्रय कोळी, शितल कांबळे, शंकर राऊत, संतोष क्षिरसागर, सचिन मोहिते, गणेश लंबाते आदि उपस्थित होते.
निरा भिमा नद्यांच्या पवित्र संगमावर वसलेल्या पुरातन हेमाडपंथी लक्ष्मी नृसिंह देवस्थानचे महात्म्य इंदापूर तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्राला परिचीत आहे. त्यामुळे प्रसिद्ध तिर्थक्षेत्र देवस्थान म्हणून ओळख आहे. दरवर्षी लाखो भाविक याठिकाणी येवून नतमस्तक होत असतात. माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आपल्या प्रत्येक राजकीय निवडणुकीतील प्रचाराचा शुभारंभ याच मंदिरात नारळ वाढवून करत असतात. तसेच त्यांनी विशेष बाब म्हणून तिर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर करून घेवून २८० कोटी रूपयांचा निधी मंजूर करवून घेतले आहे. यातून भाविकांसाठी सोयीसुविधा उभारल्या आहेत. त्यामुळे आमदार दत्तात्रय भरणे यांचे लक्ष्मी नृसिंह देवस्थानशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत.

नृसिंह नवरात्र महोत्सवा निमित्त आज आमदार दत्तात्रय भरणे यांनी लक्ष्मी नृसिंहाची विविधत पुजा करून दर्शन घेतले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, सध्याला शेतकरी राजा चोहोबाजूंनी अडचणीत आला आहे. अस्मानी व सुलतानी संकट बळीराजाच्या पाचवीला पुजली आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी ना उमेद झाला आहे. त्यामुळे यंदा पाऊस-पाणी चांगला पडून माझ्या बळीराजाचे शेत-शिवार पुन्हा एकदा भरभरून पिकु दे तसेच शेतमालाला चांगला भाव मिळून शेतकरी बांधवांच्या जिवनात समृद्धी येऊ दे अशा प्रकारचे साकडे आमदार दत्तात्रय भरणे यांनी श्री लक्ष्मी नृसिंह चरणी घातले.
यावेळी देवस्थानच्या वतीने आमदार दत्तात्रय भरणे यांचा सन्मान सागर काकडे यांनी शाल, श्रीफळ देवून केला. यावेळी सुर्यनारायण दंडवते, गौरव दंडवते, प्रसाद दंडवते, श्रीराम डिंगरे, नंदू देवळे आदि पुजारी मंडळी उपस्थित होती.



