माळीनगर ग्रामस्थांच्या वतीने क्रॉसिंग कट पॉईंटच्या मागणीसाठी चालू असलेल्या आंदोलनास यश
प्रतिनिधी- रियाज मुलाणी
माळीनगर श्रीहरी नगर या ठिकाणी गेले काही दिवसापासून सर्व ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन सुरू होते ते आंदोलन आज ग्रामस्थांच्या वतीने स्थगित करण्यात आले.
माळीनगर येथे श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरती रस्त्याच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे जाण्यासाठी कोणत्याही प्रकारची सोय नसल्याकारणाने संबंधित प्रशासनाच्या विरोधामध्ये गेली 8 महिने पाठपुरावा करूनही आज पर्यंत कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नव्हती म्हणून येथील सर्व नागरिकांनी एकत्र येत त्यामध्ये महिला असतील, पुरुष असतील तसेच तरुण वर्ग या सर्वांनी मिळून दि 07/10/2024 रोजी पासून या ठिकाणी कट पॉईंट / अंडर पासिंग रोड करून मिळावा ह्यासाठी लाक्षणिक साखळी उपोषण सुरू केले होते,
त्याची दखल घेत प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग कार्यालय पंढरपूर यांनी तोंडी व लेखी स्वरूपामध्ये येथील पाहणी अहवाल पूर्ण करून नागरिकांकडून मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे संबंधित ठिकाणी अंडर पासिंग रोड साठी आपली समर्थता दर्शविली आहे. तसेच या ठिकाणचा प्रस्ताव वरील कार्यालयाला पाठवून काम मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे, म्हणून सर्व नागरिकांच्या उपस्थितीमध्ये प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग पंढरपूर यांच्या प्रतिनिधीच्या समवेत लेखी पत्र स्वीकारून चालू असलेले साखळी उपोषण स्थगित केले आहे व ग्रामस्थांच्या वतीने वरील मागणी लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी प्रकल्प संचालक यांना विनंती केली आहे. या मागणीसाठी जर उशीर लागला तर पुन्हा याच ठिकाणी सर्व नागरिक उपोषण करतील असे सांगण्यात आले आहे.
सदर सुरू असलेल्या उपोषणाला लोकप्रतिनिधी माळीनगर मधील वेगवेगळ्या राजकीय संघटना तसेच सामाजिक संघटना ,महिलावर्ग, ज्येष्ठ नागरिक, सर्व तरुण वर्ग व या आंदोलनाचा आवाज सर्व लोकांपर्यंत व शासनापर्यंत पोहोचविण्याची सर्वात महत्त्वाचे काम सर्व पत्रकार बंधू, न्यूज चैनल, यांनी मोठ्या सहकार्याने केले त्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करून आंदोलन स्थगित करण्यात आले.