महाराष्ट्र

करमाळा मतदारसंघातील नवदुर्गांचे आशीर्वाद प्रा. रामदास झोळ सरांच्याा सोबत..!

करमाळा प्रतिनिधी आलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने करमाळा तालुक्यातील नारी शक्तीचा जागर होऊन वातावरण धार्मिक झालेले आहे. नवरात्र उत्सवामध्ये करमाळा मतदारसंघातील महिलांना लक्झरी बस मधून प्रा. रामदास झोळ फाउंडेशनच्या माध्यमातून देवदर्शन घडवून आणण्यात येत आहे.

दत्तकला शिक्षण संस्थेच्या सचिवा सौ. मायाताई झोळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणी उत्कृष्ठ नियोजनातून पार पडत असलेल्या देवदर्शनाच्या कार्यक्रमाला करमाळा मतदारसंघातील महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे हा मतदारसंघात चर्चेचा विषय बनला आहे. करमाळा तालुक्यातील प्रत्येक गावांमधून तीन ते चार बसेसच्या माध्यमातून या नवरात्र उत्सवाच्या नऊ दिवसांच्या देवदर्शनाला पिपळे- कुरकुंब-सिद्धटेक-राशीन-करमाळा असा प्रवास होता याला तालुक्यातील नवदुर्गांनी म्हणजेच महिलांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला.
देवदर्शनासाठी जात असताना विसाव्याच्या ठिकाणी म्हणजेच दत्तकला शिक्षण संस्था भिगवन या ठिकाणी महिलांना उपवासाच्या नाश्त्याची सोय करण्यात आली होती.

तसेच हळदी कुंकू लावून साडी चोळी देऊन दत्तकला शिक्षण संस्थेच्या सौ. माया ताई झोळ यांच्याकडून महिलांचा सन्मान करण्यात येत होता. यावेळी अतिशय आपुलकीने नियोजित असलेल्या या कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या महिला वर्गातून प्रा. रामदास झोळ सर आणि मायाताई झोळ यांच्या विषयी आपल्या भावना व्यक्त केलेल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पहावयास मिळतत होत्या. या महिला वर्गाकडून सांगण्यात येत होते की या अगोदर असे नियोजन कोणीही केले नव्हते, अतिशय आपुलकीने प्रेमाने माया झोळ मॅडम यांच्याकडून हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. आम्ही हे उपकार कधीही विसरणार नाही , सरांच्या आंदोलनाने थकलेली ऊस बिल मिळाली, दुष्काळात मतदारसंघात टँकरने केलेला पाणीपुरवठा आम्ही विसरू शकत नाही, शिक्षणाच्या करत असलेल्या सोयी सुविधा, आराधी गायन स्पर्धा, या देव दर्शनाच्या माध्यमातून महिलांना एकत्र येता आल अशी भावना व्यक्त करत असतानाच येत्या काळामध्ये झोळ सरांच्या पाठीमागे महिलावर्ग मोठ्या संख्येने ताकतीने उभा राहील अशा प्रतिक्रिया महिला वर्गातून येत होत्या. रोज किमान दोन ते अडीच हजार महिला या दर्शन सेवेचा लाभ घेत आहेत म्हणजेच मतदारसंघातील किमान पंधरा हजार बायकांना देव दर्शनाचा लाभ यामुळे मिळाला आहे. यामुळे एवढ्या महिलांच्या थेटपणे संपर्कात जात सौ मायाताई झोळ यांनी आपली महिला वर्गाविषयींची भूमिका मांडून महिला जर पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत असेल तर त्या घराची पर्यायाने गावाची तसेच पुढे जाऊन तालुक्याची प्रगती होण्यास मोठा हातभार लागत असतो हाच उदात्त हेतू ठेवून महिलांच्या कला गुणांना वावं देण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला असल्याची भावना झोळ मॅडम यांनी बोलून दाखवली होती.

या देव देवदर्शनाच्या वेळी महिलांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया पाहून येत्या काळामध्ये झोळसरांच्या पाठीमागे महिला वर्गाची शक्ती मोठ्या प्रमाणावर उभी राहणार आहे हे या निमित्ताने पाहायला मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button