आई कमला भवानीचे सिंहावर आरुढ होऊन सीमोल्लंघन संपन्न!!
करमाळा प्रतिनिधी आलिम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
करमाळा तालुक्यातील प्रसिद्ध श्री कमलादेवी मंदिरामध्ये विजयादशमीनिमित्त श्री कमला भवानी माता सिंहावर आरुढ होऊन सीमोल्लंघन संपन्न झाले सायंकाळी पाच पंचेचाळीस वाजता कमला भवानी माता मंदिर मंदिरामधून निघाली यावेळी भवानी मातेला पुष्पहार व घटाच्या धानाची माळ परिधान करण्यात आली ही सेवा फुलारी बंधू यांनी अर्पण केली
तसेच छबिण्यासमोर दिवटी धरण्याचा मान बबन दिवटे यांना आहे त्यांनी आपली सेवा अर्पण केली मुस्लिम समाजातील इंताज शेख कळवात नंदू जामदार पद्माकर सूर्य पुजारी तसेच रविराज पुराणिक प्रमोद गायकवाड खांदेकरी हनुमंत पवार श्रीराम फलफले प्रभाकर दौंडे भैय्या चव्हाण धर्मराज बिडवे अभिमान पवार राजेंद्र फलफले सतीश अनभुले बापू चांदगुडे बिबीशन फलफले यांनी आपली खांदेकरी सेवा अर्पण केली श्रीकांत गोमे रमेश येळवणे हे मुख्य आराधी उपस्थित होते
यावेळी बापूराव पुजारी ओंकार पुजारी दादासाहेब पुजारी विजय पुजारी तुषार सोरटे भिकूआप्पा सोरटे इत्यादी मानकरी हजर होते यावेळी छबीना मिरवणूक खंडोबा मंदिराजवळ आल्यानंतर खंडोबाची पालखी देवीच्या बरोबर सीमोल्लंघन साठी नेण्यात आली या पालखीचे मानकरी शेखर पवार पुजारी मंगेश मोकाशी तसेच वाघ्या मुरळी उपस्थित होते यावेळी सरपंच सिद्धेश्वर सोरटे ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर फलफले इत्यादी उपस्थित होते. त्यानंतर सीमोल्लंघन स्थळावर सोने लुटण्याचा कार्यक्रम पार पडला यावेळी हजारो भक्तगणांनी दर्शनाचा लाभ घेतला