शैक्षणिक
महषिॅ प्रशालेत दहावीच्या परीक्षार्थींचे गुलाब पुष्प देऊन स्वागत

अकलूज प्रतिनिधी शकुर तांबोळी
शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित महषिॅ शंकरराव मोहिते प्रशाला एस एस सी परीक्षा केंद्र क्रमांक 3103येथे प्रशालेचे सभापती ज्येष्ठ विधीज्ञ नितीनराव खराडे व केद्रसंचालक संजय गळीतकर यांच्या शुभहस्ते परीक्षार्थींचे स्वागत प्रवेशद्वारावर गुलाब पुष्प व गोळ्या वाटप करून करण्यात आले. शंकरनगर ग्रामपंचायतीचे उपसरपंच सत्यशिल राजसिंह मोहिते- पाटील यांच्या वतीने सर्व परीक्षार्थींना संपूर्ण परीक्षा काळात थंड पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली.
केंद्रावर एकूण 452 परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत. महषिॅ शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर ,लक्ष्मीबाई कन्या प्रशाला यशवंतनगर , श्री.विजयसिंह मोहिते पाटील विद्यालय विझोरी ,शिवरत्न शिक्षण संस्था या प्रशालेतील दहावीचे विद्यार्थी केंद्रावर परीक्षा देणार आहेत. यावेळी केंद्र संचालक संजय गळीतकर यांनी विद्यार्थ्यांना मनावर ताणतणाव न ठेवता पेपर लिहा, कॉपीमुक्त व तणाव मुक्त वातावरणात परीक्षा द्या आणि उत्तम आरोग्य ठेवून परीक्षेला सामोरे जावे यासाठी उपक्रमाचे नियोजन केले होते.
केंद्राचे उपकेद्रसंचालक म्हणून अंकुश एकतपुरे व सविता गायकवाड काम पहात आहेत . संकुलातील सर्व प्रशाला समिती सदस्य कैलास चौधरी, विनोद जाधव ,नितीन इंगवले देशमुख ,अनिल जाधव यानी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा दिल्या.काॅफीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी बैठेपथकात शेखर तपासे मंडलअधिकारी पिलीप,प्रविण गोडसे तलाठी कार्यालय यशवंतनगर, शामल कुलकर्णी अंगणवाडी पर्यवेक्षिका,रूपाली दोरकर अंगणवाडी आशासेविका उपस्थित होते.
परीक्षा संचालनाचे काम बापू बनसोडे, गुलाब कोठावळे ,अनिल पिसे यांनी पाहिले. बोर्डाने दिलेल्या निर्धारित वेळेत पेपर सुरू करण्यात आला.



