शहर

डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य बैलगाडा शर्यत स्पर्धेचे आयोजन

उपसंपादक—— हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448

सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांचे वाढदिवसानिमित्त भव्य बैलगाडा शर्यत स्पर्धेचे आयोजन बुधवार दिनांक 1 मार्च 2023 रोजी सकाळी 8 वाजता पुणे पंढरपूर रोड (पुरंदवडे भांबुर्डी जाधव वाडी रोड) ता. माळशिरस जि. सोलापूर येथे आयोजित केले असल्याची माहिती आयोजक माळशिरस तालुका काँग्रेस कमिटी व महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना माळशिरस तालुका यांच्यावतीने माळशिरस तालुका जनसेवा संघटना अध्यक्ष दादासाहेब श्रीरंग जाधव आणि गुलाबराव निंबाळकर यांनी दिली
या स्पर्धेत प्रथम क्रमांक चे बक्षीस 1,01,111 रु.द्वितीय 75, 101रु. तृतीय 51,101 रु.चतुर्थ 25,101 रु.पाचवा 16,016 रु. सहावा 9,101 रु. तर सातवा क्रमांकाचे बक्षीस 7,101 रु.चे बक्षिस देण्यात येणार असून प्रवेश फी 1000 रुपये आकारली जाणार आहे
समालोचक म्हणून सुनील मोरे (पेडगाव )व पताका पंच म्हणून आनंद जगदाळे( पेडगाव) हे उपस्थित राहणार आहेत

या स्पर्धेत भाग घेण्यासाठी खालील मोबाईल नंबर वर संपर्क साधावा सुरेश लोंढे ;-9004 974 752, दादासाहेब वाघमोडे ;-9511 454 546 ,प्रा.  डाॕ.  मोहन निंबाळकर व प्रताप झंजे -9766 444 469 ,ज्ञानदेव  वाघमोडे-9604 974 752  विजय पालवे-9096 863 169 या नंबर वर नाव नोंदणी करावी

या स्पर्धेतील नियम व अटी पुढील प्रमाणे 1) पंचाचा नियम अंतिम राहील 2 )गट सेमी फायनल चिठ्ठ्यावरती काढली जातील 3) सामना उतरलेल्या गाड्या पुन्हा सोडल्या जातील 4) बैलास मारहाण केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल 5) बैलाचा फोटो फिटनेस प्रमाणपत्र व बैल मालकाचे आधार कार्ड बंधनकारक राहील 6) बारा वाजले नंतर प्रवेश पूर्णतः बंद राहील 7) मैदान शासकीय नियमानुसार होईल 8) बक्षीस पूर्णपणे देण्यात येईल 9)मैदान पाहताना कोणाला इजा झाल्यास कमिटी जबाबदार राहणार नाही

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button