क्षमतेपेक्षा अधिक ऊसाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कायदेशीर कारवाईच्या मागणीसाठी बहुजन ब्रिगेड महासंघाचे बेमुदत धरणे आंदोलन.

विशेष प्रतिनिधी—रियाज मुलाणी,माळीनगर
मो-9921 500780
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय अकलूज यांच्या कार्यक्षेत्राच्या हद्दीत साखर कारखान्याच्या उसाचा गळीत हंगाम सुरू आहे, असे असतानाही काही ऊस वाहतूकदार हव्यासापोटी क्षमतेपेक्षा अधिक उसाची वाहतूक करत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. परिणामी ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर, ट्रक या वाहनांचा दिवसें दिवस धोका वाढलेला असून दैनंदिन मोठ्या प्रमाणावर अपघात होत आहेत त्यातच काही अल्पवयीन चालक आहेत. नियम धाब्यावर बसवून बेफामपने सदरच्या ऊसाची वाहतूक करत असताना कधी एक ट्रॉली असते तर कधी दोन ट्रॉली असतात. मोकळया ट्रॅक्टर ला चार – चार ट्रॉली जोडण्यात येत आहेत. तशीच ट्रॉल्यांची ने आण नियमबाह्य होत आहेत. अशातच काही ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या पाठीमागे बाजूस इंडिकेटर अथवा रिप्लेक्टर नाहीत त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या वाहनांचा अंदाज चुकत असून अपघात वाढून नाहक बळी जाण्याचे सत्र सुरूच असल्याने सदरच्या ऊस वाहतूक करणारे वाहनधारक वाहतुकदार, अल्पवयीन चालक यांच्यावर तात्काळ व कठोर कारवाई करावी या मागणीसाठी बहुजन ब्रिगेड महासंघाचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अकलूज या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन चालु झाले आहे.



