शहर

माजी राज्यमंत्री व हॅट्रिक आमदार तसेच पालघर जिल्हा परिषद सभापती मनीषा निमकर यांनी बहुजन विकास आघाडीला राम राम करून एकनाथ शिंदे शिवसेना गटात केला प्रवेश.

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640

पालघर जिल्ह्यातील माजी राज्यमंत्री व माजी हॅट्रिक आमदार तसेच सध्याच्या बहुजन विकास आघाडीच्या पालघर जिल्हा परिषद समिती सभापती मनीषा निमकर यांनी बहुजन विकास आघाडीला रामराम करत रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.

शिवसेना पक्ष संस्थापक स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षातील राजकीय कारकीर्दीला सुरुवात केलेल्या सफाळे येथील मनीषा निमकर यांनी 1995 ते 2004 या कालावधीत पालघर जिल्ह्यातून शिवसेना पक्षात हॅट्रिक म्हणजे तीन वेळा पंधरा वर्ष आमदारकी भूषविलेली आहे.त्यांच्या या पार्श्वभूमीवर त्यांना 2008 मध्ये राज्यमंत्रीपद बहाल करण्यात आले होते.

यानंतर अंतर्गत पक्षां मधील राजकीय घडामोडीमुळे त्यांनी आपला शिवसेना पक्ष सोडून बहुजन विकास आघाडी मध्ये प्रवेश घेतला होता. यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला होता आणि पुन्हा अखेर बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश घेऊन त्या बहुजन विकास आघाडीच्या पालघर जिल्हा परिषद समिती सभापती असताना त्यांनी रविवार दिनांक 6 ऑक्टोबर 2024 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button