महाराष्ट्र
स्वराज्य पक्षाच्या खानापुर तालुका महिला आघाडी अध्यक्ष पदी सपना गुजले यांची निवड!

प्रतिनिधी संजय निंबाळकर
लेंगरे तालुका खानापुर येथील उत्कृष्ट लेखिका उत्तम कवियत्री व सामाजिक कार्यकर्त्या सौ. सपना सागर गुजले यांची छत्रपती संभाजीराजे यांच्या स्वराज्य पक्षाच्या खानापुर तालुका महिला आघाडी अध्यक्षपदी निवड करण्यात आली .
या निवडीचे पत्र मा. नितीन (भाऊ) शिंदे प्रदेश कार्यकारणी सदस्य , मा. सुधीरभाऊ चव्हाण, जिल्हाप्रमुख दिपक मुळीक,सोमनाथ ( आप्पा ) घाटगे,ए*डव्हकेट धर्माधिकारी साहेब, अमोल (भैय्या )मंडले जिल्हा अध्यक्ष युवा आघाडी ,सुधीरभाऊ कांबळे इतर पदाधिकारी व सर्व महिला पदाधिकारी यांच्या समवेत देण्यात आले .व त्यांच्या कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.



