माढा तालुक्यावर विकासा चं नवं वादळ घोंगावतय…

आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज अकलूज
9890299499
ऐन उन्हाळ्यात आलेली लोकसभा निवडणुक आणि उन्हा बरोबर तापलेले राजकिय वातावरण मौसमी वारे वाहून देखील शांत व्हायला पाहिजे होते पण तसे न होता ते आणखी तापून सुलाखून निघत आहे…
माढा मतदार संघातुन अपेक्षे प्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची “तुतारी” धैर्यशिल मोहिते पाटील यांनी वाजवत लोकसभेत प्रवेश केला आणि सोलापूर जिल्ह्यात राजकारणाचे एक नवीन समीकरण तयार झालेले पहायला मिळत आहे…

लोकसभा निवडणुकीत माढा तालुक्याची एक हाती जबाबदारी एका उमद्या तरुणाने पेलून दाखवत माढा तालुक्याच्या गेल्या तीस वर्षांपासुन च्या राजकीय ताकतीला शह देउन गेली अन् येथूनच सुरू झाला एक नवीन राजकीय अध्याय…
“अजातशत्रु” विजयसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त काल कुर्डुवाडी येथे सर्व रोग निदान शिबिराच्या प्रसंगी जि प चे माजी सदस्य आनंद कानडे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना भविष्यात माढा विधानसभा जिंकुन विकासाच पॅटर्न राबवायचा असेल तर शिवतेजसिंह मोहिते पाटील यांना माढा तालुक्याची विधानसभा लढवावीच लागेल असे म्हणत एकच खळबळ उडवून दिली…

कानडे यांनी बोलून दाखवलेली भावना रास्त होती कारण गेल्या तीस वर्षांपासून माढा तालुक्याचा सर्वांगीण विकास रखडलेला आहे हे आता लपून राहिलेले नाहीये त्यामुळेच विकासाच मोहिते पाटील पॅटर्न राबवायचा असेल तर शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या सारख्या उमद्या तरुणाच्या नेतृत्वाखाली माढा तालुक्यातील जनतेने एकत्र येणे गरजेचं आहे,अशी चर्चा आता माढा तालुक्यात होताना दिसत आहे…
शिवतेजसिंह मोहिते पाटील यांचे नांव माढा विधानसभे साठी पुढे आल्याने तेथील जनता हि आता मागे राहणार नाही असेच वातावरण पहायला मिळत असुन जि प चे माजी सदस्य आनंद कानडे यांनी व्यक्त केलेल्या भावनामुळे सबंध माढा तालुक्यात आज दिवसभर एकच चर्चा होताना दिसत आहे…
हवामान खात्या सारखे अंदाज न लावता पुढील विधानसभे पर्यंत माढा तालुक्यावर विकासाच नवं वादळ शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या रूपाने घोंगावणार हे मात्र निश्चित खरे…



