शहर

माळीनगर गट नं-२ येथील दलित युवकावर प्राणघातक हल्ला !

उपसंपादक—— हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448


माळीनगर ता.माळसिरस येथील सनी कांबळे या युवकावर पुर्व वैमनस्यातुन भरचौकात दिवसाढवळ्या दगडाने ठेचण्याचा बेदम मारण्याचा प्रकार झाला असुन त्या युवकाचे या हल्ल्यात दोन्ही पाय फ्रॅकचर झाले आहेत.अकलूज पोलिसांनी तातडीने आरोपींना अटक केली आहे त्याबद्दल त्यांचे आभार…

पण आज भारताला स्वतंत्र मिळून 75 वर्षे झाली तरीही अजूनही दलितांवरील अन्याय अत्याचार थांबले नाहीत ही मोठी शोकांतिका आहे. सध्या महाराष्ट्र राज्यात शिंदे-फडवणीस सरकारच्या काळात दलित अत्याचार प्रमाणात वाढ दिसून येत आहे. हे सरकार स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्याच्या माघे कुत्र्यासारखे पळत आहे कोणावर अन्याय अत्याचार होऊ द्या यांना काही घेण देण नाही असो…!

विश्वास वाटणार नाही. पण आज सुद्धा हे पिडीत कुटुंब त्यांच्या राहत्या घराकडे जाऊ नये म्हणून सध्या त्यांना दमदाटी होत आहे. ते दोन दिवसापासुन मुजोर झालेल्या लोकांच्या भीतीने हे मजूर कुटुंब अकलूज येथे बायका मुलांसह दवाखान्यातच राहत आहे.सदर हल्ला झालेली घटना शेखर खिलारे याचे मित्र मिलिंद मोरे यांनी खिलारे यांना कळवताच ते त्या ठिकाणी पोहचले त्या कुटुंबातील सदस्यांची भेट घेतली. त्यांना अकलूज पोलीस स्टेशनला घेऊन गेले व पोलिस स्टेशनमध्ये बसूनच पिडीत मुलगा बौद्ध समाजाचा असल्यामुळे आरोपींवर ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करून घेतला आहे.

त्याच बरोबर त्याचे दोन्ही पाय फ्रॉकचर असल्यामुळे ( कलम ३२६ ) लागणं गरजेचं होत.परंतु सरकारी हॉस्पिटलच्या डॉक्टरच्या घोळ/बेजबाबदार पणामुळे लावण्यात आले नाही.पण खिलारे सध्या त्याच प्रयत्नात आहेत जो अन्याय (मारहाण) झाली ती अत्यंत क्रूरपणे भर चौकात केली आहे.त्यामुळे कोणत्याही आरोपींला कायदेशीर प्रक्रियेतुन सोडणार नाही.पिडीत मुलगा सध्या सुर्यवंशी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता परंतु पैशा अभावी त्यास पुन्हा उपजिल्हा रुग्णालय अकलुज येथे अडमीट केले आहे.ही घटना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पुर्व संधेला घडली आहे.

त्यामुळे याचा निषेध व्यक्त करून त्या कांबळे कुटुंबाचे पुनर्वसन करुन करावे तसेच ते कुटुंब भयभीत झाल्यामुळे त्यांना पोलिस संरक्षण देण्याची मागणी करत आहे.त्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यालयावर सोमवार १० एप्रिल रोजी स.११.वा डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक ते प्रांत कार्यालय अकलुज असा मोर्चा काढून प्रांतअधिकारी व डी.वाय.एस.पी अकलुज यांना निवेदन देणार आहे. तरी या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी सर्वांनी हजर रहावे असे आवाहन शेखर खिलारे यांनी केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button