रामभाऊ सातपुते मी सुद्धा हिंदू गोंधळी आहे तुमचं खोटा हिंदुत्व आम्हाला शिकवू नये – महेश शिंदे
टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
रामभाऊ सातपुते मी हिंदू गोंधळी समाजातील आहे.. आपण हिंदुत्वाच्या गप्पा मारता.. मागील दोन महिन्या खाली हिंदू गोंधळी समाजातील अमित साळुंखे याची छत्रपती संभाजी नगर मध्ये आंतरजातीय विवाह केल्यामुळे निर्घृणपणे हत्या करण्यात आली.. त्यावेळेस तुम्ही साधा निषेध सुद्धा केला नाही.. आणि हिंदुत्वाच्या बाता करता..हिंदू गोंधळी समाजाच्या विविध मागण्यासाठी अकलूज मध्ये गोंधळी समाज क्रांती मोर्चा निघाला सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ती बातमी पोहचली होती तरीसुद्धा तुम्ही साधा पाठिंबा दिला नाही.. साधं उपस्थिती लावली नाही.. आणि तुम्ही हिंदुत्वाच्या बाता करता..
याउलट उत्तमराव जानकर यांनी आमच्या मोर्चाला येऊन पाठिंबा दिला आम्हाला पाठिंबाचे पत्र दिलं…. उलट हे ही आश्वासन दिलं तुमच्या मागण्या मी विधानसभेमध्ये मांडणार…. माझ्या समाजाचा जो विचार करेल त्या माणसाच्या पाठीशी मी थांबेल समाजामध्ये अनेक वेगवेगळ्या पक्षांमध्ये आहेत.. कुणी कोणासोबत राहो जो ज्याचा त्याचा प्रश्न.. मला जो चांगला वाटतो मी त्याचा प्रचार करणार कारणार..
व्यक्तीगत स्वतंत्र हे मला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे…… यांची ही वास्तविकता लोकांना माहित नाही…… हा लय हिंदुत्वाच्या खात्यात बाता मारतो…. आम्ही सुद्धा हिंदू आहोत आम्हाला सांगायची गरज नाही…. आम्हाला नक्की कळतं कुठे काय करायचं …कुठे काय नाही… परंतु हिंदुत्वाचा खोटं पांघरून घेऊन आम्हाला दिशाभूल करायचं नाही….यंदाचे माझं मत मा.श्री. उत्तमराव शिवदास जानकर साहेब यांना…. राम कृष्ण हरी वाजवा तुतारी✌️✌️



