गायरान जमिनीवरील अतिक्रमण संबंधीच्या नावावर करा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विधान भवनावर मोर्चा.

माळीनगर.. प्रतिनिधी रियाज मुलाणी, मो 9921500780
महाराष्ट्रातील गायरान जमिनीचे अतिक्रमणाचे पट्टे हे संबंधितांच्या नावावर करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी कडून दिनांक 20 जुलै रोजी मुंबई विधान भवनावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे .मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर शासनाकडून गायरान व शासकीय जमिनीवरील रहिवाशांना शासनाकडून नोटीस पाठवण्यात आल्या आहेत अनेक गावात 80 ते 50 वर्षापासून गायरान जमिनीवर रहिवाशी वस्ती असल्याचे दिसून येत आहे

तरी अशा गायरान जमिनीवर मागासवर्गीय समाज असल्याचे जवळपास चित्र आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकारने विशेष कायदा करून गायरान अतिक्रमण धारक रहिवाशांना संरक्षण देण्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला आहे. याप्रसंगी सर्व गायरान अतिक्रमण धारकांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोर्चात सामील होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



