महाराष्ट्र

अकलूज येथील खलील बागवान आपल्या “मातोश्री” सह उमराह हज यात्रेसाठी सौदी अरेबिया ला रवाना होणार…

आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499

अकलूज येथील बागवान समाजातील होतकरू आणि कर्तृत्ववान युवक खलील अब्दुल बागवान हे आपल्या “मातोश्री” बिस्मिल्ला अब्दुल बागवान यांच्या सह इस्लाम धर्मातील जगप्रसिद्ध उमराह हज यात्रेसाठी रवाना होणार असल्याची माहिती टाइम्स 9 चे अकलूज प्रतिनिधी आमीर मोहोळकर यांनी दिली…

खलील अब्दुल बागवान आणि “मातोश्री” बिस्मिल्ला अब्दुल बागवान यांनी उमराह हज यात्रेसाठी रवाना होण्यापूर्वी अकलूज येथील राहत्या घरी “दुआ” चा कार्यक्रम आयोजित केला होता,त्या कार्यक्रमा प्रसंगी अत्यंत भाऊक क्षणी त्यांना सर्व समाज बांधवांच्या वतीने निरोप देण्यात आला…

या वेळी उमराह हज यात्रेसाठी जाणाऱ्या दोन्हीं समाज बांधवांचा सत्कार ॲड वजीर शेख यांच्या हस्ते करण्यात आला,या वेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हुसेनभाई शेख,खलील तांबोळी,सलीम सय्यद (सहारा सॉ मिल),छोटा जावेद बागवान,असलम तांबोळी,टाइम्स 9 चे आमीर मोहोळकर यांच्या सह दर्गा मशीद आणि बागवान समाजातील बहुसंख्य मुस्लिम बांधव उपस्थित होते…

या वेळी सर्व समाज बांधवांच्या उपस्थीती मध्ये “दुआ” चा कार्यक्रम पार पडला,सदर कार्यक्रमा प्रसंगी अकलूज,इंदापूर,करकंब,पंढरपूर,कुर्डूवाडी,टेंभुर्णी,मोहोळ,सोलापूर येथील सर्व पाहुणे रावळे आणि मित्र मंडळी हजर होते…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button