शहर

चुलत भावाच्या हलदीला आलेल्या पाहुण्यांना सोडायला गेला आणि (23) वर्षीय युवक आपला जीव गमावून बसला

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640. पालघर जिल्हा वृत्तांत

बोईसर येथील चुलत भावाच्या हळदीला आलेल्या पालघर येथील नातेवाईकांना सोडण्यासाठी गेलेल्या बोईसर येथील (23)वर्षीय युवकाचा उमरोली येथे कारचा अपघात होऊन त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.बोईसर येथील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते इसरार खान यांच्या कुटुंबांमध्ये हळदी समारंभ होता.

या हळदी समारंभात त्यांचे पालघर येथील नातेवाईक आले होते. हळदीचा समारंभ झाल्यानंतर शुक्रवारी पहाटे या नातेवाईकांना सोडण्यासाठी इसरार खान यांचा (23) वर्षीय मुलगा कैफ खान हा त्यांना सोडण्यासाठी बोईसर येथून पालघर कडे कार घेऊन निघाला होता ही कार उमरोली येथे आली असताना कैफ खान यांचा स्टेरिंग वरील तोल गेल्यामुळे समोरच्या भिंतीला या कारची ठोकर लागून अपघात होऊन कैफ खान यांना जबरी दुखापत झाल्यामुळे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button