शहर

BBC चे मालक कोण, पैसे कुठुन येतात?

उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448

18 ऑक्‍टोबर 1922 रोजी एक प्रायव्हेट कॉर्पोरेशन म्हणून ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनची स्थापना करण्यात आली. सुरूवातीच्या काळात आपले नाव करण्यासाठी संस्थेला खूप संघर्ष करावा लागला. 1926 मध्ये ब्रिटनमध्ये झालेल्या मोठ्या बंदच्या काळात आपल्या उत्तम वार्तांकनाच्या आधारावर ब्रिटनच्या नागरिकांच्या मनात विश्‍वास आणि विशेष स्थान मिळवण्यात या संस्थेला यश मिळाले
त्याच वर्षी एका संसदीय समितीच्या शिफारसीनुसार बीबीसीला एका खासगी कॉर्पोरेशनमधून सार्वजनिक कॉर्पोरेशनमध्ये परावर्तीत करण्यात आले. तसे झाल्यानंतर या संस्थेला कामाचे स्वातंत्र्य होते. मात्र ब्रिटनच्या संसदेप्रती त्यांचे उत्तरदायित्व निर्धारीत केले गेले अर्थात ते ब्रिटनच्या संसदेला उत्तर देण्यात बांधिल असतील अशी तरतूद करण्यात आली.

जॉन रीथ (1889- 1971) हे बीबीसीचे संस्थापक आहेत. 1922 मध्ये ब्रिटिश ब्राडकास्टिंग कॉर्पोरेशन कंपनीच्या रूपात स्थापन झाल्यानंतर ते पहिले महाव्यवस्थापक झाले. 1927 मध्ये बीबीसी सार्वजनिक कॉर्पोरेशन झाल्यावर ते कंपनीचे पहिले महासंचालक झाले. दुसऱ्या महायुध्दाच्या काळात नाझींच्या अपप्रचाराच्या नितीचा मुकाबला करण्यासाठी ब्रिटनने पुन्हा एकदा माहिती मंत्रालयाची स्थापना केली. त्यात जॉन रीथ यांना माहिती खात्याचे मंत्री करण्यात आले.
ब्रिटनच्या नागरिकांना मानसिकदृष्ट्‌या युध्दासाठी तयार करणे आणि त्या काळात जर्मनीचा हुकुमशहा हिटलरच्या विरोधात प्रचार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. बीबीसीला बहुतांश निधी हा वार्षिक टेलीव्हीजन शुल्कातून प्राप्त होतो. त्याखेरीज ब्रिटनची संसदही त्यांना अनुदानाच्या माध्यमातून निधी पुरवते. बीबीसी स्टुडिओज आणि बीबीसी स्टुडीओवर्क्‍स ही त्यांची उत्पन्नाची अन्य साधने आहेत.
दुसऱ्या महायुध्दाच्या काळातच आणि भारतावर जेव्हा ब्रिटिशांचे राज्य होते त्यावेळी म्हणजे 11 मे 1940 रोजी भारतात बीबीसी सुरू झाले. विशेष बाब म्हणजे त्याच दिवशी विस्टन चर्चिल ब्रिटनचे पंतप्रधान झाले. भारतीय उपखंडात सैनिकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचे माध्यम हा भारतात बीबीसी सुरू करण्यामागचा हेतू होता. बीबीसी हिंदी डॉट कॉमची सुरूवात 2001 मध्ये झाली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button