महाराष्ट्र
नीरा नरसिंहपूर पोलीस ठाण्यात ३० गावांचा समावेश, पोलीस ठाणे उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी, मोबाईल – 8378076123
- महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने राज्यपालांच्या आदेशान्वये राजपत्र प्रसिद्ध करत इंदापूर तालुक्यातील इंदापूर व नीरा नरसिंहपूर पोलीस ठाण्याच्या अंकित येणाऱ्या गावांची नावे प्रसिद्ध केली आहेत. त्यामुळे नव्याने बावडा की नीरा नरसिंहपूर पोलीस ठाण्याच्या विषय शासनाने अखेर निकाली काढला आहे.
इंदापूर तालुक्यात नीरा नरसिंहपूर पोलीस ठाण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता देवून इमारत उभारणीसाठी निधीची तरतूद केली. पोलीस ठाण्याच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होवून जवळपास दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. सध्याला इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने १० फेब्रुवारी रोजी एक राजपत्र प्रसिद्ध करत इंदापूर व नीरा नरसिंहपूर पोलीस ठाण्याच्या अंकित येणाऱ्या गावांची नावे जाहीर केली आहेत. त्यामध्ये इंदापूर पोलीस ठाण्याच्या अंकित ४५ गावांचा तर नीरा नरसिंहपूर पोलीस ठाण्याच्या अंकित ३० गावांचा समावेश केला आहे.
इंदापूर पोलीस ठाण्याच्या अंकित इंदापूर, सरडेवाडी, कांदलगाव, तरटगाव, हिंगणगाव, शहा, सुगाव, माळेवाडी, पिंपरी खुर्द, अगोती, शिरसोडी, पडस्थळ, कालठाण नंबर १, नरूटवाडी, गलांडवाडी क्रमांक १, कालठण क्रमांक २, वरंगळी, गागरगाव, करेवाडी, काळाशी, अगोती क्रमांक १, अगोती क्रमांक २, चांडगाव, भावडी, माळवाडी, पळसदेव, बांडेवाडी, लोणी, वरकुटे बुद्रुक, बळपुडी, बिजवडी, राजवाडी, पळसदेव, तरंगवाडी, व्याहळी, कौठळी, कचरवाडी, गोखळी, अवसरी, बेडसिंग, बाभुळगाव, पोंदकुलवाडी, वडापुरी, झगडेवाडी, भगतवाडी, गलांडवाडी क्रमांक २ या गावांचा समावेश केला आहे.
नीरा नरसिंहपूर पोलीस ठाण्याच्या अंकित नरसिंहपूर, टनु, गिरवी, पिंपरी बुद्रुक, गोंदी, ओझरे, लुमेवाडी, सराटी, निरनिमगाव, पिठेवाडी, भांडगाव, गणेशवाडी, बावडा, वकीलवस्ती, सुरवड, शेटफळ हवेली, काटी, रेडा, भोडणी, भाटनिमगाव, कचरेवाडी, वरकुटे खुर्द, चाकाटी, निमगाव केतकी, पंधारवाडी, खोरोची, जाधववाडी, रेडणी, बोराटवाडी, लाखेवाडी या गावांचा समावेश आहे.
नीरा भिमा नद्यांच्या संगमावर वसलेल्या नरसिंहपूर हे गाव पुणे जिल्ह्याच्या टोकावर वसले आहे. परंतू खोरोची, निमगाव केतकी येथील नागरिकांना सदरचे पोलीस ठाणे गैरसोयीचे व अन्यायकारक असल्याचे बोलले जात आहे. बावडा या मध्यवर्ती ठिकाणी पोलीस ठाणे होणे सर्वांच्याच हिताचे आहे. शासनाने याचा फेरविचार करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
चौकट – पोलीस ठाणे बावडा की नीरा नरसिंहपूर?



