शहर

सफाळे दातिवरे कोठारी आळीचा सुवर्ण महोत्सवी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640

पालघर जिल्ह्यातील सफाळे रेल्वे स्टेशन पासून 22 किलोमीटर अंतरावरील दातिवरे येथील कोठारी अळीतील ठाकूर कुटुंबीयांचा सुवर्ण महोत्सवी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व साधेपणात साजरा करण्यात आला.

50 व्या गणेशोत्सवानिमित्त संपूर्ण कोठारी अळीची स्वच्छता करून दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती. 50 वर्षांपूर्वी ज्यांनी हा गणेशोत्सव सुरू केला होता त्या संस्थापकांचा यथोचित सत्कार करण्यात आला. ठाकूर कुटुंबातील सर्व सेवानिवृत्तांचा देखील मानवस्त्र देऊन सत्कार करण्यात आला.

कुटुंबातील सुमारे 65 माहेरवाशीणीचा देखील भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. तसेच दहावीते उच्च शिक्षणात दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा देखील यावेळी गुणगौरव करण्यात आला. समाजात ऐक्य, सामंजस्य व परोपकाराचे वृत्ती वाढीस लागावी या भावनेतून हा सार्वजनिक गणेशोत्सव 50 वर्षांपूर्वी आम्ही सुरू केला असे विचार संस्थापकानी आपल्या मनोगतात व्यक्त केले. आपले विचार मांडताना संस्थापक सेवानिवृत्त व माहेरवाशीणींना आपले आनंदाश्रू आवरता आले नाहीत.

आकर्षक सजावट, भव्य सभा मंडप, उत्तम कार्यक्रमाचे नियोजन,रुचकर भोजन व्यवस्था, डीजेच्या तालावर झालेले बाप्पाचे विसर्जन हे या उत्सवाचे खास वैशिष्ट्य होते. 50 वर्षापासून सुरू असलेला एक आदर्श सार्वजनिक गणेशोत्सव म्हणून दातिवरे येथील कोठारी अळीतील ठाकूर कुटुंबीयांचे परिसरात खूप कौतुक होत आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मंडळाचे अध्यक्ष प्रवीण ठाकूर यांनी भूषविले. तर कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन सुशील ठाकूर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अजित ठाकूर आणि सर्व कार्यकर्त्यांचा मोलाचा सहभाग लाभला.
संस्थापक मार्तंड ठाकूर, रवींद्र ठाकूर, विश्वनाथ ठाकूर, अरुण ठाकूर, शरद ठाकूर ,दिलीप ठाकूर, विजय ठाकूर, राजाराम ठाकूर , मोहन ठाकूर, व प्रकाश ठाकूर या सन्माननीय व्यक्ती उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button