ब्राह्मण महिला संघ करमाळा च्या वतीने श्रावण रंग कार्यक्रम उत्साहात संपन्न

करमाळा प्रतिनिधी आलिम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
करमाळा येथील ब्राह्मण महिला संघाच्या वतीने “श्रीराम मंदीर ” किल्ला विभाग येथे “श्रावण रंग ” हा कार्यक्रम संपन्न झाला .

यावेळी महिलांनी पंचमी चा फेर धरून पारंपारिक गाणी गायिली . पारंपारिक मंगळागौरीचे खेळ खेळण्यात आले व फुगड्या , झिम्मा इत्यादी पारंपारिक खेळ खेळण्यात आले . यावेळी बहुसंख्य महिला पारंपारिक वेशभूषात आल्या होत्या . खेळीमेळी च्या व उत्साहात कार्यक्रम पार पडला .

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ब्राह्मण महिला संघाच्या अध्यक्षा सौ निलिमा पुंडे, उपाध्यक्षा सौ स्वाती मसलेकर , सचिव सौ . ज्योती कुलकर्णी , कोषाध्यक्षा सौ . आरती सूर्यपुजारी , सहसचिव सौ . शुभांगी खळदकर व सौ . माधुरी भणगे यांनी परिश्रम घेतले . मा . प्राचार्या माननीय सौ . मीरा रामनवमी वाले व सौ . ज्योती रामनवमी वाले यांचे विशेष सहकार्य लाभले .




