महाराष्ट्र

मुस्लिम समन्वय समिती,महाराष्ट्र राज्याच्या,माळशिरस शहर अध्यक्ष पदी सलीम आतार यांची निवड…

आमीर मोहोळकर,प्रतिनिधि,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499

मुस्लिम समन्वय समिती महाराष्ट्र राज्याचे
संस्थापक अध्यक्ष रशीदभाई शेख यांच्या सहमतीने आणि असंख्य कार्यकर्त्यांच्या मागणीचा विचार लक्षात घेऊन मुस्लिम समन्वय समिती,महाराष्ट्र राज्याच्या माळशिरस शहर अध्यक्ष पदी येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सलीमभाई आतार यांची निवड एका प्रसिद्धी पत्रका द्वारे काढण्यात आल्याची माहिती रशिदभाई शेख यांनी दिली…

सलीमभाई आतार यांना माळशिरस शहर अध्यक्ष पदी निवड झाल्याचे पत्र प्रदेश अध्यक्ष रशिदभाई शेख यांच्या हस्ते देण्यात आले…

मुस्लीम चळवळीच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या सलीमभाई आतार यांच्या निवडी वेळी जिल्हा अध्यक्ष सलीमभाई मुलाणी,माळशिरस तालुका अध्यक्ष समीरभाई मुलाणी यांच्या सह रियाज मुजावर,शहाबाज शेख,अजीमभाई मुलाणी,राजू आतार,अन्सार तांबोळी आणि मुस्लिम समन्वय समिती चे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते…

टाइम्स 9 शी बोलताना अध्यक्ष रशीदभाई शेख असे हि म्हणाले की,भविष्यात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समन्वय समिती,महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक समाज उपयोगी कार्यक्रम हाती घेणार असुन मुस्लिम समाजाच्या चळवळीतील जे कार्यकर्ते इमाने इतबारे संघटनेच्या कार्यप्रणाली मध्ये काम करु इच्छित असतील त्यांनी आपल्या बायोडाटा सह मुस्लिम समन्वय समिती च्या कार्यालयाशी संपर्क साधावा आम्हीं त्यांना समिती मध्ये सामावून घेऊ असे आवाहन हि रशिदभाई शेख यांनी केले…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button