राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी भावना गांधी यांची निवड

करमाळा .. प्रतिनिधी अलिम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी करमाळा येथील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या भावना भद्रेश गांधी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुवर्णा किशोर शिवपुरे यांनी निवडीचे पत्र दिले आहे.
जेऊर येथील आयोजित व्याख्यानमाले च्या दरम्यान कार्यक्रमांमध्ये हे पत्र त्यांना जिल्हाध्यक्षा सुवर्णा शिवपुरे व माजी आमदार नारायण पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील ,आमदार रोहित पवार, सेवानिवृत्त न्यायाधीश बि जे कोळसे पाटील, याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या तालुकाध्यक्षा नलिनी जाधव, शहराध्यक्षा राजश्री कांबळे, जिल्हा सरचिटणीस विजयमाला चवरे, ॲड. भद्रेश गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष वारे आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी पक्षाचे ध्येयधोरणे तळागाळात राबवण्यासाठी ही निवड करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे माजी केंद्रीय मंत्री शरद चंद्र पवार यांचे विचार सर्व सामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ही निवड करण्यात आलेली आहे असे जिल्हाध्यक्ष सुवर्णा शिवपुरे यांनी यावेळी सांगितले.

यापूर्वी भावना गांधी यांनी शिवसेनेच्या महिला आघाडी शहर प्रमुखपदापासून उप जिल्हाप्रमुख पर्यंत त्यांनी काम केलेले आहे. त्यानंतर त्यांनी भाजपाच्या महाराष्ट्र राज्य महिला मोर्चा राज्य कार्यकारणी च्या सदस्य पदी ही त्यांनी काम केलेले आहे. याशिवाय दूरसंचार विभागाच्या सल्लागार समितीवरही भावना गांधी यांनी काम केलेलं आहे. सध्या महिला दक्षता समितीवर ही ते संस्थापक अध्यक्ष म्हणून काम करत आहेत. या सर्व कामाची नोंद घेऊन त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद चंद्र पवार गटाचे ध्येयधोरणे तळागाळापर्यंत आपण पोहोचवून लोकसेवा करू असे निवडीनंतर नूतन जिल्हा उपाध्यक्षा भावना गांधी यांनी सांगितले.



