आजच्या स्पर्धेच्या युगात महिलांनी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कार्य करावे,सौ शबाना शेख

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
आजच्या स्पर्धेच्या युगात महिलांनी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कार्य करावे असे आवाहन हिसरे येथील ख्वाजा गरीब नवाज महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ शबाना अलीम शेख यांनी काढले त्या जस्मिन शेख हिचा सत्कार करताना बोलत होते

हिसरे तालुका करमाळा येथील शेतकऱ्यांची कन्या कुमारी जस्मिन झहीर शेख ही 2023 च्या स्टाफ सिलेक्शन कमिशन च्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये त्याने घवघवीत यश मिळवल्याबद्दल तिचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी शबाना शेख बोलत होत्या त्या बोलताना पुढे म्हणाल्या की आजच्या स्पर्धेच्या युगात मुस्लिम मुलींनी उच्च व पदवीधर शिक्षण घेऊन आपली प्रगती करावी

तसेच आजच्या स्पर्धेच्या युगात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करावे आजच्या मुलींनी कुमारी जस्मिन शेख हिच्यासारख्या मुलींचे आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून भविष्यात प्रगती करावी असे आवाहन सौ शबाना शेख यांनी केले
कुमारी जस्मिन शेख हिच्या या यशाबद्दल तिचे ठिकठिकाणी सत्कार करण्यात आले



