महाराष्ट्र

राजकारण सोलापूर जिल्ह्याचे,कारण माढा तालुक्याचे…? राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा शरद पवार साहेब यांच्या सह झालेल्या “त्या” बैठकीत “नेमकं काय घडलंय” याचा “तपशील” माढा चे आमदार बबनराव शिंदे यांनी तालुका वासियां समोर जाहीर करून टाकावा…

प्रतिनिधी,आमीर मोहोळकर,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499

महाराष्ट्र विधी मंडळाच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत,याच अनुषंगाने सबंध महाराष्ट्र राजकीय पक्षांच्या “बंद” ने,आंदोलनाने गरजाय सुरुवात झाली आहे,हेवेदावे,डाव-प्रतीडाव सुरु आहेत…
कुणी “घरवापसी” च्या वेडात आहे तर कुणी आपली आमदारकी वाचवण्यासाठी प्रयत्नशील असाच केविलवाणा प्रयत्न करतायेत माढा विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार बबनराव शिंदे…

बबनराव शिंदे हे आपले सुपुत्र रणजित शिंदे यांच्या साठी आग्रही भूमिकेत आहेत,तसे प्रयत्न ते गेली महिनाभर झाले करतायेत,या साठी त्यांनी देशाचे नेते शरद पवार साहेब यांची भेट सुध्दा घेतली होती परंतु शरद पवार साहेब यांच्या सोबत झालेल्या बैठकीचा तपशील अद्याप हि बबनराव शिंदे यांनी जाहीर केलेला नसल्याने माढा विधानसभा मतदार संघातील जनतेने मात्र त्या बैठकीचा तपशील चांगलाच ओळखल्याने बबनराव शिंदे हे सध्या बॅक फूटवर गेलेले पहायला मिळत आहे…

शरद पवार साहेब यांच्या “त्या” बैठकी नंतर बबनराव शिंदे यांचे पुतणे धनराज शिंदे हे अकलूज मार्गे मुंबई,पुणे,दिल्ली अशा वाऱ्या करत मी सुध्दा माढा विधानसभा मतदार संघाची निवडणुक लढवणार असल्याची “ललकारी” दिल्याने माढा तालुक्यातील जनता हि संभ्रमात पडल्याचे चित्र पहायला मिळत आहे…

शरद पवार साहेब यांच्या सह बबनराव शिंदे यांची झालेली “ती” बैठक आणि धनराज शिंदे यांनी निवडणुकीच्या रिंगणात घेतलेली “उडी” या दोन्हीं घटना बबनराव शिंदे यांची माढा तालुक्यावर असणारी पकड सैल झाल्याचे दिसत असल्याने बबनराव शिंदे यांचा राजकीय “एरा” संपल्याचे हि जाणवत आहे…

याचे कारण हि राजकीयच असु शकते ते असे,सध्या बबनराव शिंदे हे अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा मध्ये असल्याने माढा विधानसभा ची जागा सिटिंग आमदार या फॉर्म्युला नुसार तर त्यांनाच सुटणार आहे तर मग अशा मध्ये शरद पवार साहेब यांना भेटण्याचे कारण त्यांनी माढा तालुक्यातील जनतेला द्यायला काय हरकत आहे…?

आणि दुसरे म्हणजे “अजातशत्रू” विजयसिंह मोहिते पाटील साहेब यांच्या सारखे बबनराव राव शिंदे यांना जर आपल्या राजकीय कक्षा रुंदावयाच्या असतील तर त्यांनी आपले पुतणे धनराज शिंदे यांच्या साठी आग्रही रहावे,असे अनेक राजकीय जाणकारांचे मत आहे…बबनराव शिंदे हे आपले पुतणे धनराज शिंदे यांना पुढे करुन जर राजकारण करत असतील तर आपले सुपुत्र रणजित शिंदे यांना घेऊन शरद पवार साहेब यांच्या भेटीने काय साध्य केले ते बबनराव शिंदे यांनी एकदाचे जाहीर करून टाकावे…

हा झाला शिंदे परिवाराच्या राजकारणाचा भाग परंतु शिवाजी नाना कांबळे,संजय कोकाटे,मीनल ताई साठे,अभिजित पाटील,अनिल सावंत आणि लोकसभा निवडणुकी नंतर माढा तालुका दोन तीनदा पिंजून काढणारे शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी हि माढा विधान सभेची तयारी सुरू केली असल्याने आणि अशातच या मध्ये माढा तालुक्यातील जनतेने हि अकलूज च्या शिवतेजसिंह मोहिते पाटील यांचे नावास पसंती दिल्याने माढा तालुक्याचे राजकारण हे पुन्हा एकदा “शिवरत्न” मय झाल्याचे हि पहायला मिळत आहे…

तर तिकडे करमाळा तालुक्यातील जनतेने हि लोकसभा निवडणुकी वेळी जे ठरवल होत त्याच भूमिकेवर ठाम असल्याने पैलवान नारायण आबा पाटील बिनधास्त असल्याचे दिसत असुन विद्यमान आमदार संजय मामा शिंदे यांचे यावर काहीही भाष्य आलेले अजुन कुठे आढळले नसल्याने एकंदरित संपुर्ण शिंदे गटच हवालदिल झाल्याचे पहायला मिळत आहे…

करमाळा तालुक्यातील मातब्बर समजले जाणारे जयवंतराव जगताप या वेळेस हि “तुतारी” फुंकत एक वेगळा डाव टाकण्याच्या तयारीत आहे असे समजते…
माढा तालुक्याचे माजी आमदार विठ्ठलराव शिंदे यांच्या आमदारकीच्या वेळेस सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी काय भुमिका पार पाडली हे सबंध महाराष्ट्र तर जाणतोच आहे परंतु बबनराव शिंदे आणि संजय मामा शिंदे यांनी आपल्या पुतण्यासाठी या पुढील काळात असेच राजकारण केले तर स्व विठ्ठलराव शिंदे हे देखील स्वर्गातून आपल्या दोन्हीं पायातील बुट एक बबनराव शिंदे यांच्या कडे आणि दुसरा बुट संजय मामा शिंदे यांच्या कडे भिरकावल्या शिवाय राहणार नाहीत हे मात्र तितकेच खरे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button