शहर

बहुजन विकास आघाडी आमदार राजेश पाटील यांच्या आमदार फंडातून चाफेवाडी आणि नानदगडी पाडा गावातील रस्त्याचे काम पूर्ण

टाईम्स 9 न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक- 7030516640.

बोईसर विधानसभा बहुजन विकास आघाडीचे विद्यमान आमदार राजेश रघुनाथ पाटील यांच्या आमदार फंडातून पालघर विराथन बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीतील चाफेवाडी आणि नानदगडीपाडा ( निलेमोरे) गावातील सिमेंट काँक्रीट रस्त्याचे नवीन काम पूर्ण करण्यात आले आहे.
गेल्या अनेक वर्षापासून चाफेवाडी गावातील रामचंद्र चौधरी आणि स्वर्गीय गोपीनाथ घरत यांच्या घरापर्यंतचा तसेच नानदगडी पाडा( निलेमोरे)येथील लक्ष्मण किणी आणि जगदीश किणी यांच्या घरा पर्यंत असलेल्या कच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती.

यामुळे पावसाळ्यात येजा करताना या रस्त्यावरून ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत होता. म्हणून या भागातील ग्रामस्थांनी विराथन बुद्रुक ग्रामपंचायत बहुजन विकास आघाडीचे माजी सरपंच शरद घरत (उर्फ अप्पा) आणि बहुजन विकास आघाडी विटी लाईन युवा अध्यक्ष अल्पेश भोईर आणि विराथन बुद्रुक ग्रामपंचायत माजी सदस्य ज्ञानेश्वर किणी यांच्याकडे नोव्हेंबर 2022 रोजी रस्त्याबाबतची मागणी केली होती. या मागणीची त्वरित दखल घेत माजी सरपंच शरद घरत,युवा अध्यक्ष अल्पेश भोईर, माजी ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर किणी, दिलीप किणी, अंकुश भोईर आशिष भोईर, यांनी या रस्त्यासाठी आमदार राजेश पाटील यांची भेट घेऊन लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण करण्याची मागणी केली होती याबाबत आमदार राजेश पाटील यांनी त्वरित दखल घेऊन आमदार फंडातून निधी उपलब्ध करून दिल्यामुळे 13 ऑक्टोबर 2023 रोजी या नवीन दोन रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button