महाराष्ट्र

सार्थक ढेरे याने जेऊर येथील मॅरेथॉन स्पर्धा जिंकली, चारशे स्पर्धाकांनी घेतला सहभाग

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

माजी आमदार नारायण (आबा ) पाटील यांच्या 23 ऑगस्ट रोजी होणाऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने जेऊर ता. करमाळा येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

करमाळा तालुक्यात प्रथमच मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली असून युवानेते पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगले नियोजन करण्यात आले. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे 15 हजार 555 रुपये रोख रकमेचे बक्षीस वीट ता. करमाळा येथील सतरा वर्षाच्या सार्थक ढेरे याने पटकवले.

सार्थक याने 10 किमी अंतर अवघ्या 34 मिनिटात पार केले व स्पर्धा जिंकली. तर विनायक तोडकर करमाळा याने दुसऱ्या क्रमांकावर येऊन 11 हजार 111 रुपयाचे बक्षीस जिंकले. तसेच सौरभ भराटे, सावडी तिसरा क्रमांक (7 हजार 777) जिंकले. तसेच धुळा वाघामोडे, धायखिंडी, ओम मारकड, दिलमेश्वर, राहुल माने (वरकटणे ), यश घाडगे ( वरकटने ), नागेश दोन्ड (केम). अभिजित पानढरकर ( पोंदवडी ), केशव तळेकर (सावडी), अशोक तरंगे ( भाळेवाडी ) मयूर जाधव ( तरतगाव ) किरण शिंदे ( जेऊर ), ओंकार निकम ( साडे ), शुभम काळे ( करंजे ) यशराज लवले (मलवडी ), सार्थक वळेकर ( जेऊर ), सार्थक कोळेकर ( जेऊर ), हरिओम होगले ( घारगाव ), अनिकेत मोरे (वांगी ), स्वप्नील आदलिंग ( मोरवड ), शुभम सरक ( लव्हे ), महेश भांगे ( लव्हे ), अविनाश बाबर ( लव्हे ) अविनाश बाबर ( जेऊर ), गणेश पवार ( फिसरे ), शिवाजी बाथखबर (भालवणी ), आदित्य सरडे ( करंजे ) गणेश कोडलिंगे ( जेऊर ), विशाल घाडगे ( बोरगावं ) अनुष्का शिंदे ( भलवणी ), बी के कदम सर (वय 55 वर्षे ) यांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली.

युवानेते पृथ्वीराज पाटील मित्र मंडळ यांनी या स्पर्धेचे नियोजन केले. तर रोप मल्लखांबचे राष्ट्रीय पंच पांडुरंग वाघमोडे, हॅन्डबॉल राज्यस्तरीय पंच विनोद गरड, करमाळा तालुका क्रीडा समितीचे समनवयक बाळासाहेब सरक, अंगद पठाडे सर, दत्तात्रय वाघमोडे यांनी पंच म्हणून काम पाहिले. या स्पर्धेची युवानेते पृथ्वीराज पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली.

यावेळी माजी सरपंच भास्कर कांडेकर, भारत शिक्षण प्रसारक मंडळ उपाध्यक्ष अनिलकुमार गादिया,सचिव प्रा अर्जुन सरक, उपसरपंच नागेश झानजुरणे, सदस्य संदीप कोठारी, सचिन निमगिरे, सागर भगत, शांताराम सुतार, नाना मोहिते, धनंजय शिरस्कर आदी सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

जेऊर मधील नागरिकांनी स्पर्धेकांना मुख्य रोडवरून धावत असताना चेअरअप केले.विजयी स्पर्धकांचे माजी आमदार नारायण आबा पाटील, सभापती तथा शिवछत्रपती पुरस्कार विजेते डबल उप महाराष्ट्र केसरी अतुल भाऊ पाटील यांनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button