महाराष्ट्र

मुस्लिम समन्वय समिती,महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश सल्लागार पदी ॲड शफीक भाई शेख यांची निवड…

आमीर मोहोळकर,प्रतिनिधि,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499

मुस्लिम समन्वय समिती महाराष्ट्र राज्याचे
संस्थापक अध्यक्ष रशीदभाई शेख यांच्या सहमतीने आणि असंख्य कार्यकर्त्यांच्या मागणीचा विचार लक्षात घेऊन मुस्लिम समन्वय समिती,महाराष्ट्र राज्याच्या सल्लागार पदी बीड येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते ॲड शफीक भाई शेख यांची निवड एका प्रसिद्धी पत्रका द्वारे काढण्यात आल्याची माहिती दस्तुरखुद रशिदभाई शेख यांनी दिली…

सामाजिक चळवळीच्या माध्यमातून अनेक सामाजिक आणि राजकीय संघटनांशी ऋणानुबंध असलेले ॲड शफीक भाई शेख यांचे सल्ले मुस्लीम समन्वय समिती महाराष्ट्र राज्याला क्रांतिकारक ठरतील या उदात्त हेतूने त्यांची निवड करण्यात आल्याची माहिती हि रशिद भाई शेख यांनी दिली…

ॲड शफीक भाई शेख यांची निवड झाल्याची कळताच मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्र विभागातील कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला…

टाइम्स 9 शी बोलताना अध्यक्ष रशीदभाई शेख असे हि म्हणाले की,भविष्यात मुस्लिम समन्वय समिती,महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक समाज उपयोगी कार्यक्रम राबविणार असुन मुस्लिम समाजातील जे कार्यकर्ते इमाने इतबारे संघटनेच्या कार्यप्रणाली मध्ये काम करु इच्छित असतील त्यांनी आपल्या बायोडाटा सह मुस्लिम समन्वय समिती च्या कार्यालयाशी संपर्क साधावा आम्हीं त्यांना समिती मध्ये सामावून घेऊ असे आवाहन हि रशिदभाई शेख यांनी केले…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button