शहर

अकलूज पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या विविध गुन्ह्यातील आरोपींना अटक…

अकलूज पोलिस स्टेशन चे पी आय निंभोरे साहेबांच्या नेतृत्वात स्टाफ ची दमदार कामगिरी…

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

अकलूज पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण यांची कारवाई घरफोडी,चैन स्नॅकींग,फसवणुक करणारे सराईत गुन्हेगारांना जेरबंद – १,७८,०००/रुपयाचा मुद्देमाल जप्त त्यामध्ये २२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे व ८०,०००/रुपये रोख रक्‍कम हस्तगत…

गुन्ह्यांची थोड्क्यात हकीकत अशी,अकलूज पोलीस ठाणे परिसरात घरफोडी,चोरी,फसवणुक या प्रकारचे गुन्हे मोठया प्रमाणात घडत असल्यामुळे मा वरिष्ठ अधिकारी यांनी घटनास्थळी भेटी देवून वेळोवेळी गुन्हे प्रकटीकरण पथकास गुन्हे करणारे इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करुन घरफोडी, चोरी, फसवणुक चे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांनी पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकास घरफोडी,चोरी,फसवणुकी चे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.त्या अनुषंगाने दिनांक १६/०८/२०२४ रोजी पथकातील ए. एस.आय.श्रीकांत निकम,पोहेकॉ/१०९८ विक्रम घाटगे,पो हेकॉ/१५८९ शिवकुमार मदभावी,पोको/१२९६ सोमनाथ माने यांना गुप्त बातमीदाराकडून अशी माहिती मिळाली की… १) दिनांक १०/०७/२०२४ रोजी दुपारी १.०० वा.चे सुमारास फिर्यादी संध्यादेवी रावसाहेब चोरमले हया भाजीमंडई व किराणा माल घेण्याकरीता सदुभाऊ चौकातून जात असताना इसम नामे अभिमान बापू तुपे वय ५० वर्षे रा.पिटी ता.पाटोदा,जि.बीड,विकास विजय जाधव वय २७ वर्ष रा. धस पिंपळगांव ता.पाटोदा,जि.बीड यांनी त्यांचेजवळ येवून म्हणाले की,तुमच्या समोर रस्त्यावर पांढऱ्या कापडात काहीतरी बांधून पडले आहे तो दुसरा इसम घेवून गेला आहे.त्यानंतर तिसरा इसम जवळ आला व म्हणाला,येथे पडलेले पांढऱ्या कपडयातील सोने कोण घेवून गेला आहे का..? त्यावर फिर्यादीने,मला माहिती नाही असे म्हणाले,त्यानंतर पहिल्‍्या इसमाने,तुम्ही माझे आई सारखे आहात,चला त्या इसमाला शोधू,तो इसम मिळाल्यावर आपण त्याच्याकडे मिळवलेले सोने आपण दोघेजण वाटून घेवू,त्यानंतर महावीर स्तंभा जवळ तलाठी कार्यालयाकडे जाणारे रोडवर त्याने फिर्यादीस,तुमच्या जवळील सोने दया,त्या बदल्यात मी तुम्हाला सोन्याची बिस्कीटे देतो असे म्हणून त्याने फिर्यादीचे अंगावरील दागिने काढून घेतले व त्या बदल्‍यात लोखंडी बिस्कटाच्या आकाराची पट्टी त्यावर सोनेरी रंगाचे आवरण असलेली देवून आर्थिक फसवणुक केली आहे.याबाबत आरोपीकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबुली दिली आहे व दागिन्यांपैकी १ सोन्याचे मणी मंगलसुत्र दिले आहे…

२) दिनांक १२/०७/२०२४ रोजी सकाळी ०९.०० वा. चे सुमारास सदाशिवराव माने विद्यालय,अकलूज येथील श्री संत तुकाराम महाराज पालखी रिंगण सोहळ्याचे वेळी फिर्यादी बाळासाहेब सदाशिव बागाव वय ४० वर्षे रा.वडोली ता. माढा जि. सोलापूर हे दर्शनाकरीता आले असताना त्यांचे गळ्यातील दिड तोळे वजनाची चैन चोरीला गेली होती.आरोपी नामे दिपक मच्छिंद्र जाधव वय ३० वर्षे रा. शास्त्रीनगर,नावंडी नाका,पेठ बीड,जि. बीड याने केला असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचा शोध घेवून त्याचेकडे विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली देवून सदरची चैन हस्तगत करण्यात आली आहे…

३) दिनांक ०८/0८/२०२४ रोजी रात्री 0१.०० ते पहाटे ०५.०० वा चे दरम्यान फिर्यादी समीर आजाद मनीयार वय २५ वर्ष रा.ब्लड बँके जवळ,अकलूज ता.माळशिरस याचे घराचे किचनचा पाठीमागील दरवाजाचे कुलूप तोडून लाकडी दरवाजाचा कोयंडा उचकटून घरामध्ये प्रवेश करुन बेडरुममधील रोख रक्‍कम व सोन्‍्याचे दागिने चोरुन नेले होते.सदर गुन्हयाचे अनुषंगाने तपास करुन बातमीदाराकडून शुभम परशुराम भोसले वय १८ वर्षे,रोहित उर्फ गोट्या सचिन भोसले वय १८ वर्षे रा.महर्षी कॉलनी,अकलूज ता. माळशिरस व दोन विधी संघर्षग्रस्त बालक यांनी केला असल्याची माहिती मिळाल्याने त्यांचा शोध घेवून ते मिळून आल्याने त्यांचेकडे विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांना अटक करुन गुन्‍ह्यातील गेले मालापैकी ८0,000/ रुपये रोख रक्‍कम हस्तगत करण्यात आली आहे…

सदर गुन्हयांचा तपास पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी,अप्पर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर,सोलापूर ग्रामीण चे,नारायण शिरगावकर,उपविभागीय पोलीस अधिकारी,अकलूज विभाग,अकलूज,पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक योगेश लंगुटे,महिला पोलीस उपनिरीक्षक मनिषा महाडीक,पोलीस अंमलदार अमोल बकाल नेमणूक अकलूज पोलीस ठाणे हे करीत आहेत…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button