फोटोग्राफी च्या दुनियेतील बेताज बादशाह गायकवाड मामा यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान.

अकलूज प्रतिनिधी कादर शेख

मामा बद्दल काय बोलावं तेवढं कमीच आहे.
आतापर्यंतच्या जीवनातील कामाला व कार्यकीर्दला त्यांना माझा मानाचा सॅल्यूट.गायकवाड मामा माळशिरस तालुक्यात फोटोग्राफीचे पितामह(वय वर्ष 89) म्हणूनच ओळख आहे.अजून फोटोग्राफी करतात. राजू स्टुडिओमधुन या माळशिरस तालुक्यात अनेक फोटोग्राफर निर्माण झाले व तसेच बाहेरील शहरातील गुलबर्गा बारामती पुणे कोल्हापूर विजापूर बरेच कलाकार तयार होऊन स्वतःच्या पायावर उभे आहेत खूप नावे आहेत खूप स्टुडिओ आहेत.सहकार महर्षी कै शंकरराव मोहिते पाटील साहेब यांनी राजू स्टुडिओ चा पाया बांधला आणि दुकानाचे ओपनिंग केले त्यामुळे आज तागायत अनेक स्टुडिओ राजू फोटो स्टुडिओ च्या माध्यमातून उभे झाले. महर्षी काकांपासून पासून ते आत्ताच्या चौथ्या पिढीपर्यंत गायकवाड बंधू यांची तिसरी पिढी फोटोग्राफर फोटोग्राफी करत आहेत. विजय दादांच्या लग्नाची फोटोग्राफी सुद्धा मामांनीच केली व माननीय रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या लग्नाचे फोटोग्राफी मिलिंद भैय्या यांनी केली
मामांनी अनेक फोटोग्राफरचे लग्न लावून दिले आहेत अनेकांचे संसार मामांनी उभे केले आहेत
आणि शेखर भैया आणि मिलिंद भैया या दोन बंधूंनी सुद्धा मोलाची कामगिरी आहे यांनी सुद्धा अनेक फोटोग्राफर तयार केले आहेत. शिकवले आहेत.मामांनी त्यांच्या जीवनात अनेक फोटोग्राफर घडवले अनेकांचे ते गुरु आहेत. कदाचित नवीन पिढीला ही माहीत नसावी.
पण ज्यांना मामांचा सहवास लाभला आहे त्यांना सर्वांना माहित आहेत जुन्या गोष्टी. त्यांनी शिकवलेल्या फोटोग्राफी त्या फोटोग्राफरची फार मोठी यादी आहे उदाहरणार्थ श्री शंकर (तात्या) शिंदे माझे वडील. श्री हरिभाऊ बनसोडे श्री गंगाधर मामा माने श्री.मनोहर क्षीरसागर. श्री विनायक जमदाडे. स्वर्गीय मारुती मामा शिंदे सुरेश काटे व अशी अनेक नावे आहेत ज्याची यादी संपणार नाही. आमचे तर माझ्या वडिलांपासून गायकवाड कुटुंबाशी जिव्हाळ्याचे नाते.अनेकांच्या जीवनात विस्कटलेली घडी मामांनी पुन्हा बसवली आहे. मला सुद्धा माहित आहे. अनेकांना जाऊन पुण्यातून किंवा उज्वल फोटो स्टुडिओ पनवेल मधून आपल्या मायभूमीत परत आणून. त्यांना स्टुडिओमध्ये काम देऊन एक प्रकारे त्यांचे संगोपनच केले आहे.

आदरणीय मामा आणि स्वर्गीय मामी. यांनी कधी आपल्या कामगारांना कामगार प्रमाणे कधी समजलेच नाही. आपल्याच घरातला एक सदस्य आहे. असे समजून वागणूक दिली .प्रत्येक सणावाराला सर्व कामगारांना आपल्या घरी जेवायला बोलावून जेवायची पंगत मामा-मामी देत होते .अगदी छोट्या मोठ्या सणांना सुद्धा.आताच्या काळात सर्व कामगारांना घरी जेवायला कोण घेऊन जातो सांगा. मात्र मामा आणि मामींनी आपल्या सर्वच फोटोग्राफर बंधूंवर भरपूर प्रेम केले आहे. कसे चालले आहे तुझे असे आदराने आणि प्रेमाने चौकशी करत असत मामी सुद्धा विचारत असत . घरातील सदस्याप्रमाणे वागणूक असायची मामींची. अशा व्यक्तींना मनापासून खूप खूप धन्यवाद.
मामा प्रत्येकाला जीवनातील चढ-उतार बारकावे समजून सांगत असतात कारण त्यांचा तेवढा त्यांचा अनुभव दीर्घ अनुभव असल्यामुळे.जीवनातील प्रत्येक सुखा दुखात अनेकांना मामांच मार्गदर्शन लाभलं आहे. म्हणूनच मामांना त्यांच्या केलेल्या कामाची पोचपावती या गौरव पुरस्कारा मार्फत मिळत आहे धन्यवाद मामा .श्री श्रीपती (मामा)गायकवाड व स्वर्गीय श्रीमती बेबीताई (मामी)गायकवाड यांना पुन्हा एकदा मनापासून वंदन.सर्व गायकवाड कुटुंबीयांना हार्दिक शुभेच्छा..!!! मिलिंद (भैया) गायकवाड, शेखर (भैय्या) गायकवाड, चैतन्य गायकवाड सर्वांना खूप शुभेच्छा..! तुमचा आनंद द्विगुणीत व्हावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना !
सहकार महर्षी स्वर्गीय शंकरराव मोहिते पाटील त्यांच्यापासून ते सध्या चौथ्या पिढी पर्यंतचा माळशिरस तालुक्याच्या राजकीय, सहकार, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि इतर जडणघडणीचा इतिहास छायाचित्र (फोटो )स्वरूपात जतन करून नव्या पिढीला पाहता यावा यासाठी आपले अखंड आयुष्य खर्ची टाकणारे गायकवाड मामा .

समस्त छायाचित्रकार बंधू आज आपण जागतिक छायाचित्र दीन कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमा करिता सोलापूर विद्यापीठ कुलगुरू प्रा डॉ प्रकाश महानवर,डॉ.व्यंकटेश मेतन,प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.
तसेच अध्यक्ष – श्रीकांत शिंदे, उपाध्यक्ष आरीफ काझी, के.राज प्रेस संचालक राजेश कटकधोंड, बालाजी पवार,(माजी अध्यक्ष) महेश बनसोडे व दत्ता शिंदे,दक्षिण ता अध्यक्ष,अशोक सोनकटले,उत्तर ता.अध्यक्ष दत्तात्रय शिंदे,हे उपस्थित होते,
सत्कार मूर्ती जीवन गौरव पुरस्कार –
श्रीपती बाबुराव गायकवाड (अकलूज),
सुनील खिस्ते (पंढरपूर),तसेच ज्येष्ठ छायाचित्रकारयांन होनकळस,सुखदेव होटकर, किशोर गायकवाड, रामदास काटकर, शंकर वंजारे, साहिर नदाफ,व उत्कृष्ट छायाचित्रकार – राज पवार,वेणुगोपाल कोडम, राहुल गोडसे, शिवाजी धुते यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण सदाफुले व संदीप सरवदे यांनी केले,सदर कार्यक्रमा चे नियोजन ,
फोटोग्राफर बहुद्देशीय संघटनेचे अध्यक्ष- श्रीकांत शिंदे,
उपाध्यक्ष- आरिफ काझी,सचिव- किरण सदाफुले,
खजिनदार- आनंद भोसले,सह खजिनदार -श्रीकांत भंडारे सहसचिव- शब्बीर शेख, प्रसिद्धी प्रमुख – जगदीश बिराजदार,संघटक- संदीप सरवदे, मेंबर डेव्हलपमेंट – श्याम जाधव किशोर मोरे, लक्ष्मण सुतार, इम्रान शेख
यांनी केले.



