महाराष्ट्र

अकलूजचे मंडल अधिकारी पदी मनीषा लकडे

प्रतिनिधि… रियाज तांबोळी

अकलूज मंडल अधिकारी सी. एस.भोसले यांची तहसील कार्यालय माळशिरस येथे बदली झाली असल्याने त्यांच्या जागी आज सोलापूर येथील मनीषा लकडे यांनी अकलूज मंडल अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहे.

भोसले यानी अकलूज मंडल कार्यालय व चावडी याचा पूर्णतः कायापालट करून महाराष्ट्रात शासनाच्या सुंदर माझे कार्यालय अभियानांतर्गत प्रथम क्रमांक पटकावला आहे . तसेच या कार्यालयास त्यांनी आयएसओ मानांकन 9001 2015 मिळवून दिले त्याचबरोबर भोसले हे मन मिळाऊ वृत्तीचे असल्याने त्यांची जनमानसात ख्याती झाली आहे. सुंदर माझे कार्यालय अभियानअंतर्गत चा पुरस्कार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जिल्हाधिकारी मिलिंद शंभर यांचे हस्ते करण्यात आला होता.

अकलूज मंडल कार्यालयास लाभलेले नवीन मंडलाधिकारी मनीषा लकडे याही एक अभ्यासू व निष्णात व्यक्तिमत्व असलेले आहेत त्यामुळे अकलूज मंडल कार्यालयास योग्य अधिकारी लाभल्याचे समाधान नागरिक व्यक्त करत आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button