महाराष्ट्र

पालघर जिल्ह्यातील ग्रुप ग्रामपंचायत मांडे-विठ्ठलवाडी हद्दीतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न..

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय करत भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640

पालघर जिल्ह्यातील सफाळे पश्चिमेकडील ग्रुप ग्रामपंचायत मांडे- विठ्ठलवाडी येथे 78 व्या स्वातंत्र्यदिनी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील इयत्ता पहिली ते पाचवी व इयत्ता १० वी ते पदवीधर पर्यंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न झाला.

यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच महेंद्र पाटील यांनी “देशाला देण्यासाठी तुमच्याकडे दहा मिनिटे आहेत का ?” या डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या विचारांचे भाव स्पष्ट करताना सांगितले की देशाविषयीचा प्रत्येक चांगला विचार कोणतेही सामाजिक कार्य म्हणजेच देशासाठी दिलेला वेळ होय. त्याचबरोबर दिनेश पाटील, दर्शना पाटील व राजेश पाटील यांनी आपले भाव व्यक्त केले. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पहिली ते पाचवीच्या लहान बालकांनी आपल्या छोट्या छोट्या भाषणातून भारत माते विषयी कृतज्ञता व्यक्त केली.

जिल्हा परिषद शाळेच्या प्रत्येक वर्गातून प्रथम येणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. तसेच इयत्ता दहावी , बारावी व पदवी संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या प्रसंगी उपसरपंच हर्षल भोईर, निवृत्त फॉरेस्ट अधिकारी संदेश पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष आदित्य पाटील, ग्रामसेवक प्रतीक्षा पाटील, नितेश पाटील, मोहन पाटील आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button